सातारा

Gram Panchayat Election : राजपुरीसह भिलारला पोलिसांचा रुट मार्च

रविकांत बेलाेशे

भिलार (जि. सातारा) : पाचगणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या पार्श्वभूमीवर राजपुरी व भिलार या मतदार केंद्राच्या ठिकाणी पोलिसांनी संचलन करून शांततेत मतदान पार पाडण्याचे आवाहन केले.
 
तालुक्‍यातील ग्रामपंचायतींपैकी संवेदनशील केंद्र असलेल्या राजपुरी व भिलार या दोन गावांत पोलिस विभागाने संचलन केले. मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारच्या अनुसूचित घटना घडू नयेत, याविषयी तेथील ग्रामस्थांशी पोलिस अधिकाऱ्यांनी संवाद साधला.

हर बाजी काे जितना हमें आता है! गावागावांवर सर्वपक्षीयांचा दावा
 
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने पाचगणी पोलिस दलाच्या वतीने विशेष दक्षता घेतली जात असून, त्याचाच एक भाग म्हणून दोन गावांमध्ये जातीय दंगा काबू प्रात्यक्षिक राबविण्यात आले. या योजनेमध्ये पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अधिकारी, 24 पोलिस अंमलदार, 11 होमगार्ड सहभागी झाले होते. जातीय दंगा काबू रंगीत तालीम झाल्यानंतर राजपुरी, आम्रळ, भिलार या ग्रामपंचायत ठिकाणी प्रमुख चौक, वस्त्या, ग्रामपंचायत कार्यालय या मुख्य ठिकाणी रुट मार्च घेण्यात आला. या संचलनामुळे गावांतील गैरप्रकारावर निर्बंध येणार आहेत. एकदम एवढे पोलिस गावामध्ये रस्त्यावरून संचलन करत असल्याचे पाहून ग्रामस्थांतही उत्सुकता निर्माण झाली होती.

मंगलाष्टका सुरु असतानाच पोलिस शिरले मंडपात अन् म्हणाले, सावधान!

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : गेल्या दहा वर्षांमध्ये मोदींवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही - अजित पवार

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

Khambatki Ghat : भररस्त्यात बस बंद पडल्याने पुणे-सातारा महामार्गावरील खांबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT