सातारा : जिल्ह्यातील ८१५ ग्रामपंचायतींनी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या ग्रामपंचायतींनी मास्कमधून सुमारे २३ लाख ७३ हजार ५११ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीमार्फत मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. त्यानुसार जावली तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींनी मास्कसह सार्वजनिक जागेत थुंकणे, दुकानात जादा गर्दी यामधून सुमारे ९५ हजार ४४० रुपयांचा दंड वसूल केला. कराड तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींकडून ३ लाख ३ हजार ८२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. खंडाळा तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींकडून १ लाख ८ हजार २०४ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. खटाव तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींनी १ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरेगाव तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींनी ४ लाख ९५ हजार ८३० रुपयांचा दंड वसूल केला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींकडून ३७ हजार २०९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. माण तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींनी २ लाख २१ हजार ७५४ रुपयांचा दंड वसूल केला. पाटण तालुक्यातील ११२ ग्रामपंचायतींनी २ लाख ११ हजार ४१९ रुपयांचा दंड वसूल केला. फलटण तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींनी १ लाख ९३ हजार १६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सातारा तालुक्यातील १४३ ग्रामपंचायतींनी ३ लाख ६९ हजार ४७२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाई तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींनी १ लाख ४७ हजार ८५६ रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.