सातारा

सातारा : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी; आता सिव्हिलमध्ये 'ही' यंत्रणा ठरणार उपयुक्त

सिद्धार्थ लाटकर

सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा असलेल्या कोविड अतिदक्षता विभागाची उभारणी करण्यात आलेली आहे. हा अतिदक्षता विभाग कोविड रुग्णांसाठी मोलाचे ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज (साेमवार) केले.

येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात अत्याधुनिक कोरोना केटर सेंटर उभारण्यात आले आहे, याचे उद्घाटन आज पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
साताऱ्याच्या कंदी पेढ्यांविषयी उदयनराजे म्हणाले...

येथे 14 आयसीयु बेड, सात व्हेंटीलेरची तसेच इतर सुविधा कोरोना सेंटरमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. सर्वसामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेले हे सेंटर सर्वसामान्यासाठी दिलासादायक ठरणार आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे, नागरिकांनी घाबरुन न जाता काही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा म्हणजेच वेळीच उपचार करता येतील.
बाहेरच्या जिल्ह्यातील प्रवास करुन आलेल्या व्यक्तींनी आपली माहिती न लपावता आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी दक्षता घेऊन बाजार पेठांमध्ये वस्तु खरेदी करतांना सुरक्षीत अंतर पाळण्याबरोबर मास्क प्रत्येकाने घालने बंधनकारक आहे, तरी नागरिकांनी प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.

काय सांगता! नाही नाही म्हणता...48 कोटी जमा झाले

राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे..

कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जनतेनेही प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. कोणीही उपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता शासनाबरोबर प्रशासन घेत आहे. काही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन गृहराज्यमंत्री (ग्रामीण ) श्री. देसाई यांनी यावेळी केले.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणतात, यामुळे एन्काऊंटरला प्रोत्साहन मिळते; निर्णयाचा फेरविचार व्हावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: मुंबईतल्या मेट्रो-३ प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; रिझर्व्ह बँकेसोबत भूखंड विक्रीचा करार पूर्ण

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates Live : नागपूरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

OBC Reservation: ''ओबीसींचं आरक्षणच संपलं..'', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत दिला जीव

SCROLL FOR NEXT