शेततळ्यात बुडून बहीण- भावाचा मृत्यु  sakal
सातारा

पाटण : शेततळ्यात बुडून बहीण- भावाचा मृत्यु

बुडत असताना त्याला वाचवायला बहिण पायल गेली तीही बुडु लागली

हेमंत पवार

पाटण : शेततळ्यातील पाण्यात भावाचा पाय घसरुन तो बुडत असताना मदतीसाठी धावलेल्या बहिणाचाही बुडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी पाचच्या सुमारास पाटण तालुक्यातील येराडजवळील रोमनवाडी येथे घडली. त्यामुळे खळबळ उडाली असुन हळहळ व्यक्त होत आहे. सौरभ अनिल पवार (वय १७) व पायल अनिल पवार (वय 14, दोघेही रा. काठी-अवसरी, सध्या रा. विजयनगर) अशी संबंधित मृत्यु झालेल्या मुलांची नावे आहेत.

याबाबत स्थानीकांकडुन मिळालेल्या माहिती अशी ः येराडजवळील रोमनवाडी येथील परशराम सावंत (रा. सातारा) यांच्या फार्म हाऊसवर रोमनवाडी येथील सचिन जाधव हे कामास आहेत. त्यांच्याकडे पाहुणे म्हणुन अनिल पवार हे आपल्या पत्नी व दोन मुलांसमवेत तेथे गेले होते. तेथे सचीन जाधव, अनिल पवार व त्यांच्या पत्नी या बोलत बसल्या होत्या. त्यादरम्यान सौरभ आणि पायल हे दोघे बहिण भाऊ पळत शेततळ्याकडे गेली. तेथे सौरभचा पाय पाण्यातुन घसरल्याने तो शेततळ्यात बुडत असताना त्याला वाचवायला बहिण पायल गेली. त्यादरम्यान तीही बुडु लागली.

ही बाब सचीन जाधव व मुलाचे आई वडील यांच्या लक्षात येताच ते धावत तेथे गेले. मात्र ती तोपर्यंत ते दोघेही पाण्यात बुडाली होते. रात्री उशीरा शिरळ येथील मच्छीमारांनी त्या मुलांचे मृतदेह शेततळ्यातील पाण्याबाहेर काढले. पाटणचे पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील, पोलिस कर्मचारी, सरपंच प्रकाश साळुंखे, तलाठी पी. जी. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सौरभ याला नुकताच रेठरे बुद्रुक येथील आय टी आय कॉलेजला प्रवेश मिळाला होता. तर पायल ही विजयनगर येथे विद्यालयात आठवीमध्ये शिकत होती. या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Quota Conflict: सक्षम खातील, दुर्बल बघत राहतील... मूळ ओबीसींच काय होणार? नेपाळसारखी परिस्थिती अन्...; आरक्षण अभ्यासकांचा इशारा

Digital Minister: मंत्रिपदाची जबाबदारी 'एआय'वर; टेंडर्सवर ठेवणार नजर, भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले

Central Government Employees and Pensioners: दिवाळीआधी केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांना सरकारकडून मिळणार मोठा दिलासा!

Ashes 2025-26 : मॅथ्यू हेडन विवस्त्र होऊन MCG स्टेडियमला चक्कर मारणार? मुलगी ग्रेसची Joe Root ला एक विनंती, वाचा काय प्रकरण

Jan Aushadhi Kendra: आता घराजवळच स्वस्त औषधे मिळणार! हजारो जनऔषधी केंद्र उघडणार, नवा नियम कधीपासून लागू होणार?

SCROLL FOR NEXT