Heavy Rain esakal
सातारा

Tauktae Cyclone : अंबवडेत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; नुकसान होऊनही पंचनामे नाहीत!

वादळी वाऱ्यासह पावसाने विभागात अंबवडे येथील घराचे पत्रे उडून नुकसान झाले.

विलास खबाले

विंग (सातारा) : वादळी वाऱ्यासह पावसाने (Heavy Rain) विभागात अंबवडे येथील घराचे पत्रे उडून नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करताना काहीचे झालेलेच नाहीत. पाच दिवस उलटूनही पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे प्रशासन नुकसानग्रस्तांची दखल घेणार का? हा प्रश्न सध्या शेतकऱ्यांपुढे आहे. (Heavy Rain In Ambawade Area Satara Marathi News)

वादळी वाऱ्यासह आणे, अंबवडे, कोळे परिसराला तडाखा बसला. ठिकठिकाणी घरांचे पत्रे उडाले. झाडे उन्मळून पडली. वीज खांब कोलमडले. शेती पिकांचे मोठे नुकसान केले. हा परिसर कोळे महसूल अंतर्गत येत असल्याने तलाठ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. नुकसानग्रस्तांचे पंचनामे मात्र कार्यालयात बसून केले आहेत. चोवीस तासांच्या आत पंचनामे करताना कागदोपत्री पूर्तता केलेल्या कुटुंबीयांचे पंचनामे पूर्ण झाले नाहीत. अंबवडेत नुकसानग्रस्त कुटुंबीयांच्या पंचनाम्याकडे दुर्लक्ष झाल्याचे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

तेथील सोनाजी साळुंखे कुटुंबाचे नाव असून, संबंधित वयोवृद्ध असून, अंथरुणावर खिळून आहे. त्या कुटुंबीयांच्या घराचा पत्रा उडून गेला आहे. वीजही गायब आहे. अंधारात ते व त्यांच्या पत्नी राहात आहेत. त्यांचा पंचनामा झालेला नाही ते कुटुंब दुर्लक्षित राहिले आहे. नवनाथ पाटील यांच्याही घरावरील पत्रे उडाले आहेत. अंबवडेसह आणे, शिंगणवाडी मिळून एकूण 48 जणांचे पंचनामे झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, ज्यांचे खरेच नुकसान झाले आहे. ते मात्र त्यापासून वंचितच आहेत.

Heavy Rain In Ambawade Area Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT