Phaltan-Sangli Route esakal
सातारा

Satara Rain : पुराच्या पाण्याने खचला दुधेबावीचा पूल; फलटण-सांगली महामार्गावरील वाहतूक विस्कळित

दुधेबावी, बागेवाडी, बरड परिसरात काल दुपारनंतर ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सर्वत्र दाणादाण उडाली.

सकाळ डिजिटल टीम

दरम्यान, ओढ्याच पुरात एक जण वाहून गेला. मात्र, स्थानिकांनी प्रसंगावधान राखत संबंधिताचा जीव वाचविला.

दुधेबावी : फलटण तालुक्यातील दुधेबावी, बागेवाडी, बरड परिसरात काल दुपारनंतर ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सर्वत्र दाणादाण उडाली. परिसरातील बंधारे तुडुंब झाले. दरम्यान, फलटण-सांगली मार्गावरील (Phaltan-Sangli Route) ओढ्यांना आलेल्या पुलात एक जण वाहून गेला; परंतु त्याचा जीव वाचविण्यात स्थानिकांना यश आले, तसेच फलटण-शिंगणापूर मार्गावर (Phaltan-Shingnapur Route) मिरढे येथे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

दुधेबावी, मोगराळे घाटाच्या पायथा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने परिसरातील बहुतांशी बंधारे तुडुंब भरले आहेत, तर अनेक लहान मोठ्या तलावांनी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे बांध वाहून गेले आहेत. फलटण-सांगली रस्त्यावरील ओढ्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळित झाली होती.

दरम्यान, ओढ्याच पुरात एक जण वाहून गेला. मात्र, स्थानिकांनी प्रसंगावधान राखत संबंधिताचा जीव वाचविला. सदर घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी, तसेच दुधेबावीचे पोलिस पाटील हणमंतराव सोनवलकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुलावरून वाहत असलेल्या पाण्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता पाण्यातून कोणी वाहने घालणार नाहीत याची दक्षता घेतली.

तसेच तत्पर हालचाल करून येथील कच्च्या व छोट्या मार्गांवरून दुचाकी व हलकी वाहनांची वाहतूक दुधेबावी ते गिरवी रस्ता व तेथून गिरवी प्रादेशिक योजनेलगत पुन्हा प्रमुख रस्त्यावरून फलटणकडे वळविली. त्याचबरोबर फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनीही समक्ष भेट देऊन, योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना दिल्या. पावसाचा व पाण्याचा जोर ओसरल्यानंतर व पुलावरून वाहणाऱ्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर या मार्गांवरील वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्यात आली. बंधारे, तसेच तलावांनी पाणी आल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधान आहे.

हिंगणगावचा तलाव भरला

आरडगाव : हिंगणगाव परिसरामध्ये दुपारनंतर झालेल्या पावसात सर्वत्र पाणीच पाणी झाले. पहिल्याच पावसात बुरसुंडी तलाव ७० टक्के भरला आहे. हिंगणगाव परिसरात पाऊस इतका जोरदार होता, की हिंगणगाव, आरडगाव, सासवडे, शेरीचीवाडी, तांबवे, चव्हाणवाडी, चांभारवाडी आदी परिसरातील ओढ्यांवरून पाणी वाहत होते. त्यामुळे सातारा-लोणंद व सातारा-फलटण मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे.

भीज पाऊस असल्याने शेता, मळ्यातून, ओढ्या नाल्यातून पाणी खळाळून वाहत होते. काही ठिकाणी माती वाहून गेल्याचे चित्र होते. पहिल्याच पावसात बुरसुंडी तलाव भरल्याने परिसरात पाण्याची चिंता मिटली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने खरिपाच्या पूर्व मशागतीच्या कामांना वेग आला होता. आता पडलेल्या पावसाने खरिपाच्या पेरण्या सुरू होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council decision : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोदी सरकारकडून 'GOOD NEWS' ; दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होणार

No GST on Insurance: आरोग्य व जीवन विम्यावर शून्य GST; तुमच्या पॉलिसीचा हप्ता किती कमी होणार?

GST tax slabs : 'जीएसटी' बैठकीत मोठा निर्णय ; आता फक्त दोनच टॅक्स स्लॅब असणार

Uday Samant: लंडनमध्ये ‘मराठी भाषा केंद्र’! महाराष्ट्र मंडळाची इमारत ताब्यात घेणार

Video : दादर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये अग्नितांडव, १० ते १२ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT