Heavy Rain esakal
सातारा

तारळ्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार; विजेचे खांब पडून सात गावे अंधारात

तारळेसह विभागात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (सातारा) : तारळेसह विभागात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटात सुमारे तासभर पावसाने (Heavy Rain) झोडपून काढले. त्यात छप्पर व घरावरील पत्रे उडून गेले. झाडेही उन्मळून पडली, तर विजेचे खांब पडून सात गावे अंधारात आहेत. आंब्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (Heavy Rain In Tarle Area Satara News)

तारळे विभागात पावसाने धुमाकूळ घातला. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले. पावसाने नांगरट झालेल्या शेतातील ढेकळे फुटली आहेत. अनेक शेतांत पाणी साचून राहिले. त्यामुळे बळीराजा खुश आहे. मात्र, वारे आणि पावसाने आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झाडे व फांद्या मोडून पडल्या आहेत. खबालवाडीत बाळासाहेब खबाले- पाटील यांच्या घराचा व शशिकांत जाधव यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. घरातील धान्य भिजून नुकसान झाले.

वेखंडवाडी शिवारात विजेचा पोल पडल्याने पंढरवाडी, वजरोशी, चिंचेवाडी, करमाळे, दुसाळे, बांधवाट, पाबळवाडी आदी गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तारळेच्या शिवारातही खांब पडून कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. ओढे- नालेही भरून वाहिले. खांब पडल्याने सात गावे अंधारात आहेत. वीज कंपनीकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Heavy Rain In Tarle Area Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT