Grapes Farmer Sakal
सातारा

अतिवृष्टीमुळे साताऱ्यातील द्राक्षबागायतदार तोट्यात; उत्पादन निम्म्यावर

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्षबागायतीला फटका बसला असून, यंदा द्राक्ष उत्पादानावर त्याचा परिणाम झाला आहे.

अंकुश चव्हाण

कलेढोण : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्षबागायतीला फटका बसला असून, यंदा द्राक्ष उत्पादानावर त्याचा परिणाम झाला आहे. लहरी हवामान, अपुरा सूर्यप्रकाश व अवकाळी पावसाच्या अतिप्रमाणामुळे यंदा द्राक्षशेती अडचणीत आली आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे यंदा द्राक्षबागायतीत खर्च केलेली मुद्दलही शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही. पुढील दोन वर्षांपर्यंत द्राक्षबागायतदार आर्थिक संकटातून बाहेर पडणार नसल्याचे शेतकरी बोलत आहेत. (Heavy Rain farmer Loss Grapes Production Decrease)

जिल्ह्यात खटाव तालुक्यातील द्राक्षआगार असलेला कलेढोण, विखळे, मुळीकवाडी, गारळेवाडी, तरसवाडी, मायणी, चितळी, निमसोड, फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी, बोडकेवाडी, धुमाळवाडी, जाधववाडा, तर माण तालुक्यातील म्हसवड, देवापूरच्या परिसरात द्राक्षबागायतीचे क्षेत्र आहे. येथील दुष्काळी पट्ट्यातील द्राक्षांना परदेशात चांगला दर मिळतो. त्यातून शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे राहातात.

मात्र, यंदा अवकाळी पावसामुळे द्राक्षबागेत पाण्याचे प्रमाण अति झाले होते. त्यातच द्राक्षबागांना ऑक्टोबर छाटणीनंतर अपुरा सूर्यप्रकाश मिळाल्याने फळधारणा नीट झाली नाही. सुमारे ३० ते ३५ घडांची संख्या असलेल्या झाडावर केवळ दहा ते १५ घड आल्याने उत्पादनात घट झाली. तर अतिथंडीमुळे द्राक्षांना तडे जाणे, बुरशी येण्याचे प्रमाण वाढल्याने उत्पादनात पुन्हा घट झाली.

नैसर्गिक संकटामुळे अत्यल्प प्रमाणात निर्यातक्षम द्राक्षे तयार झाली. कलेढोण परिसरातील दहापैकी एखाद्याच शेतकऱ्याची द्राक्षे निर्यात झाली. त्यातही दराची घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. एकरी सुमारे अडीच ते तीन लाख खर्च होणाऱ्या बागांतून मुद्दलही हातात मिळाले नसल्याने द्राक्षबागायतदार यंदा तोट्यात गेले आहेत.

...असा मिळाला दर

  • -स्थनिक बाजारपेठ : अंदाजे २५ ते ४५ पर्यंत प्रतिकिलो

  • -युरोप बाजारपेठ : अंदाजे ८७ ते ९२ पर्यंत प्रतिकिलो

‘‘अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र द्राक्ष संघाप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला तर दलाली कमी होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.’’

-विठ्ठल सस्ते, निरगुडी, ता. फलटण

‘‘कलेढोण व भागातील शेतकऱ्यांना यावर्षी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. मुद्दलही हाती न मिळाल्याने पुढील दोन वर्षांपर्यंत द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटातून बाहेर येणे अशक्य आहे.’’

-प्रवीण कदम, कलेढोण, ता. खटाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT