रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कापील येथे आदिलशाहीच्या काळात उभा केलेला गोलघुमट शासनदरबारी अद्याप दुर्लक्षित आहे. गेली कित्येक वर्षे या ठिकाणची देखभाल व दुरुस्ती न झाल्याने या घुमटाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सभोवती वाढलेल्या झाडवेलीच्या साम्राज्याने ही प्राचीन वास्तू नजरेआड होताना दिसत आहे. हा ऐतिहासिक ठेवा जोपासण्यासाठी शासन पातळीवर हालचाली व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे.
कापील येथे मलकापूरनजीक गोलघुमट ही अतिप्राचीन वास्तू आहे. आदिलशाहीच्या राजवटीत कऱ्हाडनजीक सैनिकांचे तळ असताना आदिलशहाच्या राज्यातील प्रमुखांनी सैन्याबरोबरचा कुटुंबकबिला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी मलिकापूर म्हणजेच आताच्या मलकापूरनजीक वस्ती केली होती. कापीलच्या हद्दीत सैन्याच्या कुटुंबीयांची व्यवस्था करण्यासाठी निवासाची व पाण्याची सोय करण्यात आली. त्यामधीलच गोलघुमट ही वास्तू आहे. तेथून काही अंतरावर चौकोनी पाण्याची विहीर आहे. प्राचीन काळातील अद्भुत कलाकृतीच्या नमुनेदार अशा दोन्हीही वास्तू आहेत. गोलघुमट व विहिरीची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. घुमट परिसरात मोठी झाडे वाढली आहेत, तर विहिरीची पडझड सुरू आहे. शासनाने ही प्राचीन वास्तू जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जुन्या वास्तू सुरक्षित करतच त्या संवर्धित केल्या पाहिजेत. आपल्या मुलखातील इतिहासाच्या पाऊलखुणा आपणच जतन केल्यास पुढील पिढीसाठी आदर्शवत बाब होईल. यादृष्टीने शासनाने लक्ष केंद्रित केले पाहिजे.
-के. एन. देसाई, इतिहास अभ्यासक, काले
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.