Crime News esakal
सातारा

पोलिस अधिकाऱ्याच्या आईचा पुण्यात खून; डोक्‍यात लोखंडी रॉड मारून केली हत्या

सातारा शहर वाहतूक शाखेत सहायक निरीक्षकपदी विठ्ठल शेलार हे कार्यरत आहेत.

गिरीश चव्हाण

सातारा : सातारा शहर वाहतूक शाखेत कार्यरत असणारे सहायक निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्या पुणे येथे राहणाऱ्या आईचा अज्ञाताने डोक्‍यात लोखंडी रॉड मारून पहाटेच्या सुमारास खून केला. शांबाई अरुण शेलार (वय 65, रा. रामनगर, वारजे) असे त्यांचे नाव आहे. (Homicide Of Police Officer Mother In Pune Satara Crime News)

सातारा शहर वाहतूक शाखेत सहायक निरीक्षकपदी विठ्ठल शेलार हे कार्यरत असून, त्यांची आई शांबाई (वय 65) या वारजे माळवाडी (पुणे) येथील रामनगर भागात राहण्यास आहेत. शांबाई यांचे रामनगरातील भाजीमंडई परिसरात भंगार दुकान आहे. या दुकानालगतच्या छोट्या घरात त्या राहण्यास होत्या. आज पहाटेच्या सुमारास त्यांचा डोक्‍यात लोखंडी रॉड मारून अज्ञाताने खून केला.

हा प्रकार पहाटे दुकानात भंगार विकण्यासाठी आलेल्या एकाच्या निदर्शनास आला. याची माहिती मिळाल्यानंतर वारजे पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. शांबाई शेलार यांचा खून कोणी आणि कोणत्या कारणासाठी करण्यात आला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आईचा खून झाल्याचे समजल्यानंतर विठ्ठल शेलार हे पहाटेच्या सुमारास सातारा येथून पुण्याकडे रवाना झाले. याची नोंद वारजे पोलिस ठाण्यात झाली आहे.

Homicide Of Police Officer Mother In Pune Satara Crime News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT