सातारा

अकरा हजारांपैकी केवळ एकशे पंधरा लाेकांनीच स्विकारली नोकरी; असे का बरं घडले

उमेश बांबरे

सातारा : कोरोनात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या पण संसर्गाच्या भीतीने तरुण तालुका व जिल्हा सोडून नोकरीच्या ठिकाणी जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे नोकऱ्यांवर कोरोना संसर्गाचे सावट पाहायला मिळत आहे. जून व जुलैमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्यांत तब्बल 11 हजार 112 उमेदवारांनी नोकरीसाठी नोंदणी केली. त्यापैकी जूनमधील मेळाव्यात केवळ 115 युवकांना नोकरीची संधी मिळाली आहे.
केवळ 12 तासांत हजारोंची मदत!,  

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे जिल्ह्यात सुमारे साडेतीन लाख लोक स्वगृही आले. तर जिल्ह्यातून सुमारे अडीच लाख कामगार व कर्मचारी बाहेरच्या जिल्ह्यांसह इतर राज्यांत निघून गेले. परिणामी लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर नोकरीसाठी पुन्हा बाहेर जाण्याऐवजी जिल्ह्यातच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यास सोपे होईल, असे सर्वांना वाटत होते. तसेच स्थानिक उद्योग, व्यवसाय तसेच मोठ्या कंपन्यांनाही कर्मचारी व कामगारांची आवश्‍यकता निर्माण झाली होती. परिणामी हे सर्व ओळखून स्थानिक भूमिपुत्रांना जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यात नोकरी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मदत करण्याचे धोरण घेतले. त्यानुसार जुनमध्ये 18 ते 19 असा दोन दिवस ऑनलाइन रोजगार मेळावा घेतला. यामध्ये नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व रोजगार व स्वयंरोजगार तसेच कौशल्य विकास विभागाने केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात झालेल्या ऑनलाइन रोजगार मेळाव्यात तब्बल पाच हजार 962 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 115 उमेदवारांना नोकरीची संधी मिळाली आहे. उर्वरित युवकांच्या मुलाखती आणि इतर प्रक्रिया संबंधित कंपन्यांकडून सुरू आहे. पण, कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने युवक तालुका सोडून बाहेर जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे नोकऱ्या उपलब्ध असूनही केवळ कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे उमेदवार गाव व परिसर सोडण्यास तयार नाहीत.

उपमुख्यमंत्र्यांचा आदेशाच्या कार्यवाहीस प्रारंभ, शैक्षणिक संस्थाचालकांची उडाली घाबरगुंडी 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटात खळबळ; भाजप आनंदीत 

त्यानंतर जुलैमध्ये 15 ते 17 तारखेला ऑनलाइन नोंदणी रोजगार मेळावा झाला. यामध्ये तब्बल पाच हजार 150 उमेदवारांनी नोंदणी केली. यातील इच्छुक उमेदवारांच्या नोकरीसाठीची प्रक्रिया सुरू आहे. पण, उमेदवार तालुका व जिल्हा सोडून बाहेर जाण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचा नोकऱ्यांवरही परिणाम झाल्याचे चित्र आहे. यासाठी आता शासनाने युवक, युवतींसाठी समुपदेशन करण्यावर भर देणे गरजेचे आहे. 

हाे हे शक्य झालंय; महाबळेश्वर तालुक्‍यात अर्ध्या तासातच अहवाल मिळताेय कोरोनाचा

""कोरोनात सातारा जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यांत नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. पण, कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने उमेदवार नोकरीच्या निमित्ताने बाहेर जाण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रोजगार मेळाव्यांत मोठ्या प्रमाणात नोंदणी होऊनही प्रत्यक्ष नोकरी मिळण्याचे प्रमाण कमी दिसत आहे.'' 

- सचिन जाधव, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, सातारा

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

Pune News : प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात; दंड भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

Vishwas Pathak : जीएसटी कमी झाल्याने नागरिक आनंदी; भाजप प्रवक्ते विश्‍वास पाठक

SCROLL FOR NEXT