Satara esakal
सातारा

हद्दवाढीमुळे सातारा पालिकेच्‍या तिजोरीवर ताण, निधीअभावी विकास रखडला!

गिरीश चव्हाण

सातारा : हद्दवाढ झाल्‍यामुळे पालिकेत (Satara Municipality) आलेल्‍या शाहूपुरी, विलासपूरसह इतर भागांतील विकासकामे निधीअभावी रखडली आहेत. या भागातील कामे मार्गी लावण्‍यासाठी आवश्‍‍यक निधी उपलब्‍ध करून देताना पालिकेच्‍या तिजोरीवर ताण येत आहे. यामुळे या भागांसाठी यापूर्वी ग्रामविकास विभागाने (Rural Development Department) मंजूर केलेला सुमारे तीन कोटींचा निधी पालिकेकडे वर्ग करण्‍याची मागणी पालिका प्रशासनाने शासनाकडे केली आहे. (Impact Of Gram Panchayat Boundary Extension On Satara Municipality Development Fund Satara Marathi News)

हद्दवाढीनंतर शाहूपुरी, विलासपूर या दोन पूर्ण ग्रामपंचायती तसेच दरे खुर्द, शाहूनगर, पिरवाडीसह इतर भाग पालिकेत सामील झाला आहे.

गत सात महिन्‍यांपूर्वी सातारा पालिकेची हद्दवाढ (Satara Municipality boundary extension) मंजूर करण्‍यात आली. या हद्दवाढीनंतर शाहूपुरी, विलासपूर या दोन पूर्ण ग्रामपंचायती (Maharashtra Gram Panchayat) तसेच दरे खुर्द, शाहूनगर, पिरवाडीसह इतर भाग पालिकेत सामील झाला. यामुळे शाहूपुरी, विलासपूर येथील ग्रामपंचायती बरखास्‍त झाल्‍या. ग्रामपंचायती बरखास्‍त होण्‍यापूर्वी त्‍यांनी विविध कामांसाठीचे प्रस्‍ताव तयार करत ते जिल्‍हा परिषदेकडे (Zilla Parishad) पर्यायाने ग्रामविकास विभागाकडे सादर केले होते. हे प्रस्‍ताव सादर करत असतानाच त्‍या ग्रामपंचायतींनी सुमारे तीन कोटी रुपयांच्‍या निधीची मागणी केली होती. त्‍यानुसार ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींनी सादर केलेल्‍या आराखड्यानुसार विकासकामांसाठी मागणी केलेला निधी मंजूर करत तो जिल्‍हा परिषदेकडे वर्ग केला.

हद्दवाढ झाल्‍याने शाहूपुरी, विलासपूरसह इतर भूभाग ग्रामविकास विभागाच्‍या अखत्‍यारीतून नगरविकास विभागाच्‍या (Urban Development Department) ताब्‍यात आला. यामुळे त्‍या ठिकाणच्‍या कामांसाठी ग्रामविकास विभागाने मंजूर केलेला सुमारे तीन कोटींचा निधी तांत्रिक बाबींअभावी जिल्‍हा परिषदेकडे अडकून पडला आहे. हा निधी नगरविकास विभागाकडे वर्ग करण्‍याची मागणी पालिकेने केली असली तरी त्‍यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. हा निधी मिळत नसल्‍याने पालिकेस हद्दवाढीतील भागात मंजूर असणारी विकासकामे मार्गी लावण्‍यासाठी ओढाताण करावी लागत आहे.

‘ग्रामविकास’कडील निधीसाठी पत्रव्यवहार

कोरोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे पालिकेच्‍या उत्‍पन्नावर मर्यादा आल्‍या असून, आरोग्‍यासाठी प्राधान्‍याने खर्च करावा लागत असल्‍याने अगोदरच शहरातील विकासकामे रखडत चालली आहेत. त्‍यातच हद्दवाढीतील कामांचा भार पालिकेच्‍या तिजोरीवर पडू लागला आहे. यामुळे ग्रामविकासकडे अडकून पडलेला निधी पालिकेकडे वर्ग करण्‍याची मागणी पालिका करत त्‍यासाठीचा पत्रव्‍यवहार खासदार उदयनराजे भोसले यांच्‍या माध्‍यमातून नगरविकास मंत्रालयाकडे लावून धरला आहे.

Impact Of Gram Panchayat Boundary Extension On Satara Municipality Development Fund Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT