Satara Lok Sabha Shashikant Shinde VS Udayanraje Bhosale esakal
सातारा

'माझ्या विरोधात मोठी शक्ती वापरण्यात आली, त्यामुळं माझा पराभव झाला'; शरद पवार गटातील आमदाराचं मोठं विधान

माझ्या विरोधात मोठी शक्ती वापरण्यात आली असल्याचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

''सातारा जिल्हा, यशवंत विचारांचा, शरद पवारांच्या विचाराचा करण्यासाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करू.''

कास : पराभव झाला म्हणजे सर्व संपले असे होत नाही. माझ्या विरोधात मोठी शक्ती वापरण्यात आली असल्याचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी सांगितले. तापोळा विभागातील कोयना, सोळशी व कांदाटी येथील लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) आभार दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी तालुकाध्यक्ष सुभाष कारंडे, सरचिटणीस सुनील सपकाळ, विशाल पार्टे, विलास भोसले, संतोष मोरे, जगदीप झरेकर, संतोष धनावडे, प्रकाश पडगे, बाजीराव शेलार, शंकर कारंडे, आनंद नलावडे, आशिष चोरगे, संतोष शिंदे, श्रीरंग निपाणे, नामदेव जाधव, श्रीरंग शिंदे, प्रकाश कदम, रवींद्र भालेराव, संजय भालेराव, महादेव शिंदे आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह भागातील नागरिक उपस्थित होते. त्यांनी कोयना धरण परिसरातील समस्या, दरड कोसळून वाहतुकीस होणाऱ्या अडथळ्यांच्या समस्यांची पाहणी केली.

MLA Shashikant Shinde

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना श्री. शिंदे म्हणाले, ‘‘या भागातील लोकांनी जी. जी. कदम यांच्यानंतर माझ्यावर प्रेम केले आहे. या ऋणातून उतराई होण्यासाठी, आभार मानण्यासाठी आलो आहे. निवडून आल्यानंतरच लोकांचे प्रश्न सोडवायचे, या मताचा मी कार्यकर्ता नाही. तापोळा येथील पर्यटनाला वाव दिला पाहिजे.’’ मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्पामुळे तापोळा येथील पर्यटनावर परिणाम होतोय. हा खासगीकरणाचा परिणाम आहे. येथे नाइट सफारी सुरू करता येईल का? यासाठी लोकांशी चर्चा केली आहे. यानुसार येथील कामांसाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांना ताकद देऊ

पुढील दिशा काय असेल या प्रश्नावर बोलताना श्री. शिंदे म्हणाले, पवार साहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून आम्ही काम करतो. सातारा जिल्हा, यशवंत विचारांचा, शरद पवारांच्या विचाराचा करण्यासाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT