MP Udayanraje Bhosale esakal
सातारा

Udayanraje Bhosale : 'मी 35 वर्षे सक्रिय आहे, मला समाजकारण समजलं; पण अजून राजकारण लक्षात येत नाही'

पदाच्‍या माध्‍यमातून मला लोकांची सेवा करण्‍याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्‍य समजतो.

सकाळ डिजिटल टीम

कामे करता येत नसतील तर विरोध तरी करू नका, अशा शब्‍दात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍यावर नाव न घेता उदयनराजेंनी टीका केली.

सातारा : पदाच्‍या माध्‍यमातून मला लोकांची सेवा करण्‍याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्‍य समजतो. या कामात मी कोठेही कमी पडलो नाही. गेली ३५ वर्षे मी सक्रिय आहे. मला समाजकारण समजले; पण अजून राजकारण लक्षात येत नाही, असं स्पष्ट मत खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी व्यक्त केलं.

जनता हेच माझे कुटुंब असून, मी इतरांसारखा घरातली माणसे म्‍हणजे कुटुंब समजणारा नसल्‍याचे प्रतिपादनही उदयनराजे भोसले यांनी केले.वर्ये (ता. सातारा) येथील सातारा विकास अभियानांतर्गत आयोजित सातारा-जावळीतील नागरिकांच्या आज आयोजिलेल्‍या सुसंवाद बैठकीत खासदार उदयनराजे बोलत होते.

याचवेळी त्‍यांनी घराण्याचा वारसा, वसा जपताना, शेवटच्या श्‍वासापर्यंत समाजाची सेवा करीत राहणार असल्‍याचे वचन उपस्‍थितांना दिले. या सुसंवाद बैठकीसाठी माजी आमदार सदाशिव सपकाळ, यशवंतराव ढाणे, जिल्‍हा परिषदेचे माजी उपाध्‍यक्ष रवी साळुंखे, माजी सभापती सुनील काटकर, अर्चना देशमुख, संदीप शिंदे, समृद्धी जाधव, विजय काळे यांच्‍यासह सातारा, जावळीतील मान्‍यवर आणि ग्रामस्‍थ उपस्‍थित होते.

बैठकीस उपस्‍थित असणाऱ्यांची मते जाणून घेतल्‍यानंतर उदयनराजे म्‍हणाले, ‘‘साताऱ्यातील युवकांच्‍या रोजगारासाठी इनोव्हेटिव्ह साताऱ्याच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आयटी पार्कसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा उद्योग मंत्रालयाकडे हस्तांतरणाचा प्रस्ताव आम्‍ही शासनास दिला आहे.

जिल्ह्यात जागतिक पर्यटनस्थळे असून, त्‍याठिकाणच्‍या पर्यटनास चालना देण्‍यासाठीचा आराखडा आम्‍ही तयार केला असून, जावळीसह धरणग्रस्तांचे प्रश्‍‍न निकाली काढण्‍यासाठी शासनाशी संपर्क सुरू आहे. आजपर्यंत अनेकांनी पदरमोड करत आम्‍हाला साथ दिली. कार्यकर्त्यांची जेवढी निष्ठा आमच्यावर आहे, तेवढीच माझी त्‍यांच्‍यावर आहे.

कार्यकर्ते म्हणजे कुटुंब समजून आम्ही आजपर्यंत वागलो असून, त्‍यात कोणतीही कमतरता यापुढील काळात राहणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले. याचवेळी त्‍यांनी कामे तुम्‍हीच केली, असे मी सगळ्यांना सांगतो. कामे करता येत नसतील तर विरोध तरी करू नका, अशा शब्‍दात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍यावर नाव न घेता उदयनराजेंनी टीका केली. यानंतर भाजपचे जिल्‍हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यांनी सरल आणि नमो ॲपची माहिती उपस्‍थितांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT