India Aghadi meeting at Karad detailed discussion held to decide strategy for Lok Sabha elections Sakal
सातारा

कऱ्हाडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा; लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी होणार सविस्तर चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इंडीया आघाडीच्या कऱ्हाड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मोळावा रविवारी (ता. ३१) होत आहे.

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इंडीया आघाडीच्या कऱ्हाड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मोळावा रविवारी (ता. ३१) होत आहे. त्यात आघाडीची ध्येय धोरणे आणि निवडणुक लढविण्याची रणनिती ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील हॉटेल पंकज येथील रविवारी सायंकाळी चार वाजता मोळावा होणार आहे. त्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही यावेळी आघाडीतील घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी केले.

आघाडीच्या आगामी काळातील रूपरेषा ठरविण्यासाठी मेळाव्याचे नियेजन करण्यात आले आहे. त्याची माहिती देण्यासाठी आमदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे दक्षिण तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, युवक कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, माजी सभापती मानसिंगराव जगदाळे,

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस सौ. संगीता साळुंखे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे, शेकापचे ॲड. शरद देसाई, श्रमिक मुक्ती दलाचे ॲड. शरद जांभळे, राष्ट्रवादी दक्षिणचे तालुकाध्यक्ष पांडुरंग चव्हाण, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष प्रशांत यादव उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, देशात इंडीया आघाडीची स्थापना झाली आहे. त्या अनुशंगाने येथील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यापर्यंत त्याचा उद्देश व निवडणुकीची रणनिती ठरविण्याच्या दृष्टीने महत्वाच्या बैठका घेण्याचे सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी कऱ्हाडला मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यात जिल्ह्यातील माझ्यासहीत आघाडीचे नेते पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. त्या मेळाव्याला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थीत रहावे. सातारा येथे मेळावा झाला आहे. मेढा, पाटण, जावळी, कोरेगाव येथेही मेळावे आहेत. त्याही मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळणार आहे.

राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चीत नसताना आपण मेळावे घेत आहोत. त्या मेळाव्यात उमेदवार म्हणून कोणाला पुढे करणार, या प्रश्नावर आमदार पाटील म्हणाले, राजकारणात व्यक्ती किंवा उमेदवार यापेक्षाही पक्ष व त्याची ध्येय धोरणे महत्वाची असतात. पक्ष म्हणून कार्यकर्ते, नेते जोडले जातात. व्यक्ती म्हणून नाही.

उमेदवार ठरविण्याची प्रक्रीया वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. ती पूर्ण झाली की, आघाडी जो उमेदवार देईल, त्याचा ताकदीने प्रचार आम्ही करणार आहोत. तुम्हीही निवडणुक लढवावी, अशी चर्चा होती. त्याबद्दल काय सांगाल, यावर श्री. पाटील म्हणाले, ती चर्चा होती. अशा चर्चा होत राहतात. त्याकडे फारसे लक्ष देत नाही.

काँग्रेसचे मनोहर शिंदे म्हणाले, रविवारी होणाऱ्या मेळाव्याला जास्तीत जास्त कार्यकर्ते सहभागी होतील. त्या दृष्टीने आघाडी म्हणून आम्ही एकत्रीत प्रयत्न करत आहोत. त्यात निश्चीत यश येणार आहे. आघाडीचा उमेदवारही रविवार अखेर ठरला तर त्यांच्यासहीत मेळावा होईल.

शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे हर्षद कदम म्हणाले, महाविकास आघाडी जो उमेदवार देईल, त्याचा आम्ही ताकदीने प्रचार करणार आहोत. त्यासाठी प्रामाणीकपणे पाटण तालुक्यासहीत जिल्ह्यात शिवसेना म्हणून आम्ही आमचे प्रयत्न करणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT