Indian soldier Anil Kalse Died Accident in Manipur esakal
सातारा

साताऱ्यातील रेठरे खुर्दचे जवान अनिल कळसेंना मणिपुरात वीरमरण; मृत्यूचं वृत्त धडकताच गावकऱ्यांना अश्रू अनावर

या घटनेचे वृत्त गावात धडकताच गावकरी शोकसागरात बुडाले.

सकाळ डिजिटल टीम

पुढील महिन्यात ते सुटीवर येणार असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना कळवले होते; परंतु आज सकाळी त्यांना वीरमरण आल्याचे वृत्त धडकताच गावकरी शोकसागरात बुडाले.

रेठरे बुद्रुक : रेठरे खुर्द येथील भारतीय सैन्यदलात (Indian Army) कार्यरत असलेले अनिल दिनकर कळसे यांना (Anil Dinkar Kalse) मणिपूर (Manipur) येथे सेवेत असताना अपघातात वीरमरण आले. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे.

दरम्यान, या घटनेचे वृत्त गावात धडकताच गावकरी शोकसागरात बुडाले. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव गावात आणले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, रेठरे खुर्दचे सुपुत्र हवालदार अनिल कळसे हे मणिपूर येथे भारतीय सैन्यदलात हवालदार म्हणून देशसेवा बजावत होते.

भारतीय सेनेतील बॉम्बे इंजिनिअर ग्रुपमधील २६७ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये सध्या ते कार्यरत होते. २९ सप्टेंबर २००० मध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले. २०१७ मध्ये ते सैन्यातून निवृत्त झाले होते; परंतु त्यांनी सेवा वाढवून घेतली होती. पुढील वर्षी ऑगस्टमध्ये सेवेतून निवृत्त होणार होते.

पुढील महिन्यात ते सुटीवर येणार असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना कळवले होते; परंतु आज सकाळी त्यांना वीरमरण आल्याचे वृत्त धडकताच गावकरी शोकसागरात बुडाले. याबाबत ग्रामस्थांनी सांगितले की, काल दुपारी मणिपूर येथील सैनिक तळावर जेसीबीच्या साहाय्याने काम सुरू होते.

जवान अनिल कळसे हे तेथे असताना त्यांच्या अंगावर झाड कोसळले व त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांना वीरमरण आले. गुरुवारी सायंकाळपर्यंत त्यांच्यावर शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू होती. ती रात्री उशिरा पूर्ण झाली. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव गावी येणार आहे. येथे जाई मोहिते प्रशालेजवळ अंत्यविधी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Sonography: कारमध्येच करायचे सोनोग्राफी! नाशिकमध्ये अवैध गर्भलिंगनिदान करणारं रॅकेट उघडीकस, कंपनीवरही गुन्हा

Latest Marathi News Live Update : भाजप मुंबईचं नाव पुन्हा ‘बॉम्बे’ करायला आणि महाराष्ट्राशी नातं तोडायला पाहतंय, शिवसेनेचा आरोप

तेजश्री प्रधानचा 61 वर्षीय अभिनेत्यासोबत रोमान्स, लंडनच्या गुलाबी थंडीतील व्हिडिओ, ट्रेलर चर्चेत

Horoscope Prediction : 7 डिसेंबरपासून मंगळ बदलणार त्याची चाल; 5 राशींचा गोल्डन टाईम सुरु, प्रोमोशन नक्की !

Weight Loss Plan : पोटभर भात-भाकरी-ब्रेड खावूनही 7 दिवसांत कमी केले 1.7Kg वजन; तुम्हीही फॉलो करू शकता ही स्मार्ट पद्धत

SCROLL FOR NEXT