Online
Online  esakal
सातारा

सातारकरांना आता प्रॉपर्टी कार्डही ऑनलाइन

प्रवीण जाधव - सकाळ वृत्तसेवा

प्रॉपर्टी कार्डसाठी नगरभूमापन कार्यालयात त्यासाठी घालावे लागणारे हेलपाटे थांबणार आहेत.

सातारा: ऑनलाइन सातबाऱ्याप्रमाणेच शहरातील प्रॉपर्टी कार्डचे डिजिटलायझेशनचे काम ९७ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे सातारकरांना आता शासकीय शुल्क भरून ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड काढणे शक्य झाले आहे. परिणामी प्रॉपर्टी कार्डसाठी नगरभूमापन कार्यालयात त्यासाठी घालावे लागणारे हेलपाटे थांबणार आहेत.

शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यासाठी तलाठ्याकडे जावे लागू नये, यासाठी सातबारा ऑनलाइन करण्याची मोठी मोहीम राज्य शासनाने गेल्या काही वर्षांपासून राबविली आहे. त्यामुळे शेतकरी घरबसल्या आपला सातबारा पाहू शकतात. सातबाऱ्याबरोबरच फेरफारही ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नुकतेच सातबाऱ्यातील नोंदीमध्येही बदल करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्याला साताबारा घरपोच देण्याची मोहीमही महसूल विभागाकडून राबविण्यात आली होती.

सातबारा ऑनलाइन झाला; परंतु प्रॉपर्टी कार्ड मात्र नागरिकांना नगरभूमापन कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष काढावा लागत होता. त्यासाठी नागरिकांना कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष अर्ज करावा लागत होता. अर्ज घेऊन कार्यालयात गेल्यानंतर प्रॉपर्टी कार्डवरील नोंदणीची संख्या पाहून संबंधित कार्यालयातील कर्मचारी नागरिकांना प्रॉपर्टी कार्डच्या नकलेसाठी आवश्यक असणारे शासकीय शुल्क निश्चित करून देत असे. ती रक्कम भरल्यानंतर प्रत्यक्ष अर्ज स्वीकारला जात होता. यासाठी नागरिकांना प्रत्येक ठिकाणी रांगेत थांबावे लागत होते. अर्ज स्वीकारल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी नागरिकांना आपल्या प्रॉपर्टी कार्डची नक्कल मिळत होती. या प्रक्रियेमुळे तातडीच्या वेळी आवश्यकता असल्यास प्रॉपर्टी कार्ड मिळत नव्हते. त्यासाठी नागरिकांना ओळख काढून कसरत करावी लागत होती.

प्रॉपर्टी कार्डसाठी करावी लागणारी ही तारेवरची कसरत आता थांबली आहे. सातबाऱ्याप्रमाणेच नगर भूमापन कार्यालयाने प्रॉपर्टी कार्डचे डिजिटलायझेशनची प्रक्रिया सुरू केली आहे. सातारा शहरामध्ये सध्या एकूण ४७ हजार प्रॉपर्टी कार्ड आहेत. यातील ४६ हजार प्रॉपर्टी कार्डचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे. केवळ एक हजार प्रॉपर्टी कार्डचे डिजिटलायझेशन शिल्लक राहिले आहे. स्वॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे हे काम राहिले आहे. त्याबाबतची माहिती एनआयसीला देऊन ते कामही मार्गी लावण्याचे काम नगर भूमापन कार्यालयाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

...असे उपलब्ध होइल ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड

डिजिटलायझेशन पूर्ण झालेली ४६ हजार प्रॉपर्टी कार्ड शहरातील नागरिकांना आता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होत आहेत. https://digitalsatbara.mahabhumi.gov.in या साइटवरून जाऊन नागरिक आपले प्रॉपर्टी कार्ड काढू शकतात. त्यासाठी सातारा शहरासाठी कमीतकमी १३५ रुपये व त्यावर प्रॉपर्टी कार्डवरील नोंदणीनुसारचे अधिक शुल्काची रक्कम ऑनलाइन पद्धतीनेच येते. ती रक्कम ऑनलाइन भरल्यानंतर नागरिकांना आपल्या प्रॉपर्टी कार्डची डिजिटल साईन असलेली प्रत उपलब्ध होणार आहे.

‘‘सातारा शहरातील प्रापर्टी कार्डचे ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे. उरलेले तीन टक्के काम युद्धपातळीवर सुरू आहे. महिन्याभरात शहरातील सर्व प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन उपलब्ध होतील. सध्या ज्यांना ऑनलाइन कार्ड उपलब्ध होत नसेल, त्यांना नगर भूमापन कार्यालयात पूर्वीप्रमाणे प्रॉपर्टी कार्ड देण्याची सोय केलेली आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.’’

- किरण नाईक, नगर भूमापन अधिकारी, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT