Jalna Maratha Andolan Maratha Kranti Morcha Devendra Fadnavis esakal
सातारा

Karad : लाठी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अन्यथा..; मराठा क्रांती मोर्चाचा स्पष्ट इशारा

हल्ल्याचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज कऱ्हाडात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन निषेध नोंदवण्यात आला.

हेमंत पवार

जालन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला.

कऱ्हाड : मराठा समाजाच्या (Maratha Community) आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी शांततेत धरणे धरणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी काल अमानुष अत्याचार केले. महिला, लहान मुलांवर लाठीमार करीत त्यांना जखमी केले.

त्याविरोधात आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने (Maratha Kranti Morcha) कऱ्हाड (जि. सातारा) येथील दत्त चौकात निषेध करण्यात आला. 15 सप्टेंबर पर्यंत संबंधितांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देत गृहमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.

जालना येथील पोलिस लाठीमाराची संतप्त प्रतिक्रिया येथे उमटली. जालन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या हल्ल्याचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज शनिवारी कऱ्हाडच्या दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन निषेध नोंदवण्यात आला. अमानुषपणे तरुणांना मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ कऱ्हाडमध्ये रस्ता रोको

शांततेत धरणे धरणाऱ्या मराठा आदोलकांवर पोलिसांनी काल अमानुष अत्याचार केले. महिला, लहान मुलांवर लाठीमार करीत त्यांना जखमी केले. त्याविरोधात आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कऱ्हाड (जि. सातारा) येथील दत्त चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

SCROLL FOR NEXT