Venna River esakal
सातारा

मित्रांसह पोहायला गेलेला युवक वेण्णा नदीपात्रात बुडाला; सर्व मित्र काठापासून दीडशे फूट आत पोहत गेले अन्..

Medha Police Station : सिद्धेश जवळ आपल्या मित्रांबरोबर सकाळी सातच्या सुमारास मेढा-मोहाट पुलावर वेण्णा नदीपात्रात पोहायला गेला होता.

सकाळ डिजिटल टीम

सर्व मित्र काठापासून साधारणतः शंभर ते दीडशे फूट आत पोहत गेले. त्या वेळी सिद्धेश सर्वात पुढे पोहत होता. अचानक तो पाण्यात बुडाला.

कास : मेढा मोहाट पुलाजवळ वेण्णा नदीपात्रात (Venna River) मित्रांसह पोहायला गेलेला युवक बुडाला. आज सकाळी हा प्रकार घडला असून, दिवसभर त्याचा शोध सुरू होता. सिद्धेश विष्णू जवळ (वय १९, रा. जवळवाडी, मेढा) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून व मेढा पोलिस ठाण्यातून (Medha Police Station) मिळालेल्या माहितीनुसार, जवळवाडी (मेढा) येथील सिद्धेश जवळ हा युवक आपल्या मित्रांबरोबर सकाळी सातच्या सुमारास मेढा-मोहाट पुलावर वेण्णा नदीपात्रात पोहायला गेला होता. सर्व मित्र काठापासून साधारणतः शंभर ते दीडशे फूट आत पोहत गेले. त्या वेळी सिद्धेश सर्वात पुढे पोहत होता. अचानक तो पाण्यात बुडाला.

जवळच पोहत असलेल्या मित्रांनी हे पाहिले; पण घाबरून ते माघारी फिरले. सिद्धेश जिथे बुडाला तेथून जवळूनच दक्षिण विभागाला वीजपुरवठा करणारी मुख्य लाइन गेली आहे. त्यामुळे विजेचा धक्का बसून तो बुडाला, की दम लागून पाण्यात बुडाला, याबाबत दिवसभर परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होती.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महाबळेश्वर रेस्क्यू आणि ट्रेकर्सला शोधकार्यासाठी बोलावण्यात आले. दिवसभर बोटीच्या साहाय्याने अँकर, गळ व पाण्यातील कॅमेऱ्यांच्या मदतीने शोधकार्य राबविले; पण सिद्धेश सापडला नाही. संध्याकाळी सातनंतर अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT