Chandrakant Patil Jaykumar Gore esakal
सातारा

भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी प्रथमच आमदाराची निवड; गोरेंकडं मोठी जबाबदारी

सकाळ डिजिटल टीम

भारतीय जनता पक्षानं आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जिल्हाध्यक्ष बदलला आहे.

सातारा : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) जिल्हाध्यक्षपदी आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांची नियुक्ती करण्यात आलीय. याबाबतची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नुकतीच केली. आगामी निवडणुका आणि पक्ष संघटना वाढविण्यासाठी आमदार गोरेंवर भाजपनं मोठी जबाबदारी दिलीय. दरम्यान, विद्यमान जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर (Vikram Pawaskar) यांना प्रदेशवर संधी देताना त्यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती केलीय.

भारतीय जनता पक्षानं आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जिल्हाध्यक्ष बदलला असून, प्रथमच आमदाराकडं जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार जिल्हाध्यक्षपदी आमदार गोरे यांची नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. दरम्यान, मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) लीगल सेलचे महासचिव अखिलेश चौबे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय या वेळी उपस्थित होते.निवडीनंतर चंद्रकांत पाटील यांनी बुके देऊन आमदार गोरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यात एक खासदार व दोन आमदार आहेत. आगामी जिल्हा परिषद (Zilla Parishad), पंचायत समिती, पालिका व बाजार समितींच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रथमच एका आमदाराकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा भाजपने दिली आहे. आमदार गोरे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे. त्यांचा आक्रमकता लक्षात घेऊन जिल्ह्यात राष्ट्रवादीला टक्कर देण्याची भाजपची रणनीती असणार आहे. आमदार गोरेंच्या या निवडीमुळे जिल्हा भाजपमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT