Udayanraje Bhosale esakal
सातारा

जलमंदिरला कालीचरण महाराजांची भेट; राजमाता कल्पनाराजे, उदयनराजेंशी चर्चा

गिरीश चव्हाण

कालीचरण महाराजांनी आज राजमाता कल्‍पनाराजे आणि उदयनराजे यांची भेट घेतली.

सातारा : अकोला येथील आध्यात्मिक गुरू कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी आज येथे येऊन जलमंदिरला (Jalmandir) भेट दिली. या भेटीदरम्‍यान त्‍यांनी राजमाता कल्‍पनाराजे भोसले (Rajmata Kalpanaraje Bhosle) आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्याशी चर्चा केली. या वेळी भवानीमातेची त्यांनी पूजा केली.

अकोला (Akola) येथील मूळचे असणारे कालीचरण महाराज हे कालीमाता आणि शिवशंकराचे उपासक आहेत. वयाच्‍या चौदाव्‍या वर्षी त्‍यांनी कालीमातेच्‍या आराधनेस सुरुवात केली. यानंतर आध्यात्मिक गुरूंकडून शिक्षण घेत ब्रह्मचर्यव्रत स्‍वीकारले. कालीचरण महाराज यांचा राज्‍यात तसेच देशाच्‍या विविध भागांत मोठा भक्‍तवर्ग आहे.

आज त्‍यांनी येथे जलमंदिर येथे राजमाता कल्‍पनाराजे आणि उदयनराजे यांची भेट घेतली. भेटीदरम्‍यान विविध विषयांवर चर्चा करत त्‍यांनी अध्‍यात्‍माची माहिती उपस्‍थितांना दिली. यानंतर त्‍यांनी जलमंदिरातील भवानीमातेच्‍या मंदिरात जाऊन भवानीमातेची पूजा केली. भोजपूर येथील भोजेश्‍‍वर मंदिरात त्‍यांनी गायलेले शिवतांडव स्‍तोत्र सध्‍या सोशल मीडियावर प्रचंड व्‍हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT