central minister Kiren Rijiju sakal
सातारा

Kiren Rijiju : जगातील युनिक भूकंप सेंटर कऱ्हाडला बनवणार

भूकंप संशोधन केंद्राने भुगर्भात तीन किलोमीटर खोल बोअर मारुन केलेल्या संशोधनातुन भूकंपासह भुगर्भातील अनेक नवीन घडामोडी कशा घडत आहेत हे समोर आले आहे.

हेमंत पवार

कऱ्हाड - भूकंप संशोधन केंद्राने भुगर्भात तीन किलोमीटर खोल बोअर मारुन केलेल्या संशोधनातुन भूकंपासह भुगर्भातील अनेक नवीन घडामोडी कशा घडत आहेत हे समोर आले आहे. पृथ्वीच्या भुगर्भात काय चालले, खडकांच्या हालचाली कशा होत आहेत आहे याचे संशोधन याच माध्यमातुन केंद्रात सुरु आहे. हे संशोधन देशासाठीच नाही तर जगासाठी महत्वाचे आहे.

त्यामुळे विदेशातील संशोधकही येथे अभ्यासासाठी येत आहेत. हे सेंटर देशातीलच नव्हे तर जगातील युनिक सेंटर बनवणार असल्याची माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजीजु यांनी आज दिली.

केंद्रीय मंत्री किरेन रिजीजु यांनी जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी हजारमाची (ता. कऱ्हाड, जि.सातारा) येथील भूकंप संशोधन केंद्रास भेट दिली. त्यादरम्यान त्यांनी तेथे झालेल्या संशोधनाची माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचीव एम. रविचंद्रन, पृथ्वी विज्ञान मंत्रालयातील भुविज्ञान व भूकंपशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. निलॉय खरे, भूकंप संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सुकांता रॉय यांच्याकडुन घेतली.

मंत्री रिजीजु यांचे स्वीय सहाय्यक सचीन शिंदे, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, सागर शिवदास आदी उपस्थित होते. मंत्री रिजीजु म्हणाले, भूकंप संशोधन केंद्रातील संशोधक आणि एक्सपर्टस यांनी चांगले काम केले आहे. अजुनही पाच ते सहा हजार मीटर खोलीपर्यंत भुगर्भात जाण्याची तयारी या सेंटरने केली आहे.

आत्तापर्यंत आमच्या संशोधकांनी जे संशोधन केले आहे, त्यामध्ये भुगर्भातील अनेक नवीन हालचाली समोर आल्या आहेत. त्यातुन भूकंपाची माहिती समोर येण्यास मदत होत आहे. हे भूकंप संशोधन केंद्र हे युनिक सेंटर असुन देशात कोठेही असे सेंटर नाही.

पृथ्वीच्या भुगर्भात काय चालले आहे याचे संशोधन याच माध्यमातुन करता येणे शक्य आहे. हे संशोधन देशासाठीच नाही तर जगासाठी महत्वाचे आहे. विदेशातील संशोधकही येथे अभ्यासासाठी येत आहेत. विद्यार्थ्यांनी येथे येवुन हे संशोधन बघायला पाहिजे.

ते म्हणाले, कोयनानगर परिसरात जमिनीत तीन किलोमीटर खोल बोअर मारण्यात आली आहे. त्याव्दारे संशोधन सुरु करण्यात आले आहे. या संशोधनाबद्दल मी खुप समाधानी आहे. तीन किलोमीटर भुगर्भात जाणे हे खुप मोठे काम आहे. मात्र त्यावरच न थांबता यापुढे पाच, सात किलोमीटर टप्याटप्याने खोल बोअर मारुन त्याव्दारे भुगर्भातील संशोधन केले जाईल.

त्यातुन भूकंपाच्या दरम्यान भुगर्भात होणाऱ्या हालचाली कशा होतात याची माहिती पुढे येवुन त्याचा अंदाज देण्यास ते उपयुक्त होणार आहे. भारत विज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जात आहे. जेवढे आवकाशात संशोधन केले जात आहेत. त्यात पृथ्वी विज्ञानामध्येही भारत या संशोधनाच्या माध्यमातुन पुढे जाईल. पृथ्वीच्या भुगर्भात काय हालचाली होतात, याची माहिती आपल्याकडे नसेल तर खुप अडचणी निर्माण होतील.

आत्तापर्यंत भुगर्भातील हालचालीची माहिती खुप कमी मिळाली आहे. मात्र या संशोधन केंद्रामुळे भुगर्भात खोलवर जावुन तेथील खडक काढला जाईल. त्यावेळी त्याचा संशोधनात्मक अभ्यास चांगला होणार आहे. या संशोधन केंद्राने केलेले काम हे रेकॉर्डेड आहे. विद्यार्थ्यांनी प्रॅक्टीकल म्हणून येथे येवुन वेगवेगळे खडक, त्याचे वयोवमान व अन्य माहिती घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT