karad municipality
karad municipality sakal
सातारा

कऱ्हाड-मलकापूरच्या प्रश्नावरून राजकारण; पाच वर्षांत चर्चेसाठी सभाच नाही

(शब्दाकंन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : कऱ्हाड व मलकापूर दोन्ही पालिकांचे सौख्ख्य जिल्ह्याला परिचित आहे. सांडपाणी, हद्द, हुतात्मा स्मारकासह १०० फुटी रस्त्यावरून दोन्ही पालिकांतील वादही चांगलेच गाजले. मात्र, पाच वर्षांत एकही मासिक अथवा विशेष सभा घेण्यास कोणीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे दोन्ही पालिकांतील या प्रश्नावर केवळ राजकारणच होतेय, हाच अनुभव आहे. येत्या पालिकेच्या निवडणुकीतही त्यावरून आरोप, प्रत्यारोपही होतील, सभाही गाजवल्या जातील. मात्र, ते प्रश्न तसेच राहतील.

मलकापुरात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना मानणाऱ्या मनोहर शिंदे यांची सत्ता आहे. तर कऱ्हाडला उलटी स्थिती आहे. दोन्ही पालिकांच्या अनेक प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनीही संयुक्त बैठकीचा प्रयत्न केला. मात्र, त्यातूनही मार्ग निघाला नाही. दोन्ही पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांनीही ते प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले. त्यातही अपयश आले. कऱ्हाड व मलकापूर पालिकांत सतत हद्दीच्या विषयावरून शीतयुध्द सुरू असते. कधी बांधकाम परवानगी देण्याचे कारण असते, तर कधी मलकापूरचे सांडपाणी, पावसाच्या पाण्याचा होणारा त्रास असतो. रस्त्याच्या हद्दीचा विषयही कधी तरी चर्चेचा ठरतो. दत्त चौक ते मार्केट यार्डमार्ग बैल बाजारादरम्यानचा शंभर फुटी रस्त्याचा प्रश्न त्यातूनच चर्चेस आला. कोल्हापूर नाका परिसरात काही दिवसांपूर्वी मलकापूरव्याप्त भाग वगळून झालेला निर्णयही दोन्ही पालिकांत दरी निर्माण करणारा ठरला.

पालिका निवडणुकीत पुन्हा होणार आरोप

कऱ्हाड पालिकेच्या आगामी निवडणुकीत पुन्हा नव्याने दोन्ही पालिकांतील मतभेद उकरून काढून त्यावरून आरोप होण्याची शक्यता आहे. मलकापूर पालिकेला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेऊन स्वतःची राजकीय कारकीर्द घडवू पाहणाऱ्यांनी पाच वर्षांत त्याबाबत चकार शब्दही काढला नाही. सभा घ्यावी, अशी मागणीही कोणी केली नाही. केवळ आरोपांची मानसिकता पालिकेत सातत्याने वाढल्याने ते प्रश्न येणाऱ्यांसाठीही डोकेदुखीच ठरणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT