आशांचे आजपासून कामबंद आंदोलन; उद्या पालकमंत्र्यांना भेटणार  sakal
सातारा

आशांचे आजपासून कामबंद आंदोलन; उद्या पालकमंत्र्यांना भेटणार

हेमंत पवार -सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना चार ते पाच महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्याचबरोबर लसीकरणाचा भत्ताही दिला जात नाही. याच्या निषेधार्थ आज बुधवारी येथील तहसील कार्यालयासमोर आशा व गटवप्रर्तक यांनी निदर्शने केले. पगार आणि वाढीव भत्ता मिळेपर्यंत उद्यापासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्धार करत उद्या (गुरुवारी) पालकमंत्री यांनी भेटुन व्यथा मांडण्यात येतील असे जाहीर करण्यात आले.

कऱ्हाड (जि.सातारा) येथील तहसील कार्यालयासमोर आनंदी आवघडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, माणिक अवघडे उपस्थित होते. तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आशांनी तहसीलदार विजय पवार, सभापती प्रणव ताटे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांना निवेदन दिले. निवेदनातील माहिती अशीः राज्य सरकारने लवकरात लवकर आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावावा. जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत उद्यापासुन काम बंद करण्यात येत आहे. आशा, गटप्रवर्तकांवर कामाचा ताण मोठ्या प्रमाणावर वाढवलेला आहे, मात्र पगार दिले जात नाहीत. पुढच्या पंधरा दिवसांवर दिवाळी सण येवून ठेपला आहे. तरीही पगार नाही, लसीकरणाचा भत्ता नाही. त्यामुळे आशा स्वयंसेविका उद्या पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना भेटुन पगार व भत्याची मागणी करणार आहेत.

सकाळ चाही पाठपुरावा

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करुन शासनाला अद्ययावत माहिती दिली. त्यांना तुटपुंजे मानधन मिळते. त्यावर त्यांचे कुटुंब चालते. मात्र त्यांनी जोखमीचे काम करुनही त्यांना पाच महिन्यांपासुन पगार न मिळाल्याने त्यांच्यावर मोठे बिकट संकट आले आहे. त्यासंदर्भात दैनिक सकाळ नेही लक्ष वेधुन त्यांची व्यथा मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

IPL 2026: Umpire चा दुजाभाव? मुंबई अन् दिल्लीला वेगवेगळा नियम? हार्दिकच्या ग्लव्ह्ज बदलीमुळे होतायेत आरोप

पगार २५ हजार सांगून १५ हजारच देतात, २५० रुपये वाढ देऊन उपकार केल्याचं दाखवतात; कंपन्यांकडून लूट, कर्मचाऱ्यांचा संताप

Oil Supply Explainer: हॉर्मुज सामुद्रधुनी उघडली तरी पेट्रोल-डिझेल, LPG गॅसच संकट कायम! नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT