Satara Sakal
सातारा

अपहरण करणाऱ्यांना चार तासांत जेरबंद; पोलिसांची कामगिरी

पोलिसांनी अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली आहे.

सलीम अत्तार

पुसेगाव : स्टोन क्रशरवर काम करणारे मारुती माणिक बंडगर (Maruti Bandagar) (वय ४६) यांना दोघांनी लाल रंगाच्या कारमधून पळवून नेऊन त्यांना सोडण्याकरिता २० हजारांची मागणी करणाऱ्या संशयितांना चार तासांच्या आत ताब्यात घेण्यात पोलिसांना (Police) यश मिळाले असून, पोलिसांनी अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले, गुरुवारी (ता. ३०) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मारुती बंडगर यांना दोघांनी लाल रंगाच्या कारमधून पळवून नेऊन त्यांना सोडण्यासाठी २० हजारांची मागणी केली असल्याची फिर्याद जोतिबा मारुती बंडगर (रा. धावडदरे, ता. खटाव) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दाखल केली. या गुन्ह्याची माहिती सातारा येथील नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच नियंत्रण कक्ष अधिकाऱ्यांनी कऱ्हाड येथील रात्रगस्त अधिकारी व पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ सातारा जिल्ह्यातील रात्रगस्त करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना आपापल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून वरील रंगाची कार आढळल्यास अपहृत व्यक्ती व संशयितांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.

रात्रगस्त करीत असलेले बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ व सातारा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश जगताप यांना गोपनीय माहिती मिळाली, की अपहरण झालेली व्यक्ती व संशयित हे सातारा येथील राजवाडा परिसरात आहेत. या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सातारा येथील राजवाडा परिसरात शोध घेऊन अपहृत व्यक्ती व संशयितांना चार तासांच्या आत ताब्यात घेतले. संशयितांना पुढील कारवाईसाठी पुसेगाव पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या गुन्ह्याचा तपास पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे करत आहेत.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ, सातारा शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश जगताप, हवालदार डी. डी. जाधव, पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार एस. बी. येवले, एस. एल. मोकाशी, आर. सी. जाधव, हवालदार व्ही. व्ही. जाधव, एस. जे. माने, आर. टी. जाधव यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT