Ajit Pawar  esakal
सातारा

Political News : 'या' बड्या नेत्याच्या घरी अजित पवारांची NCP नेत्यांसोबत खलबत्तं; राजकीय चर्चांना उधाण

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

सकाळ डिजिटल टीम

सभेपूर्वी श्री. पवार हे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांचे स्वागत आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले.

पळशी : राष्ट्रवादीचे नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल (सोमवार) आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांसोबत बैठक घेऊन खलबते केली. या बैठकीतील तपशील समजू शकला नाही.

दरम्यान, प्रदीर्घ कालावधीनंतर श्री. पवार कोरेगावात आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांसोबत नेमकी काय चर्चा केली, याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे. कोरेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत (Koregaon Bazar Samiti Election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ काल कोरेगाव येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सभेपूर्वी श्री. पवार हे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यांचे स्वागत आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, नितीन पाटील, प्रभाकर देशमुख, सुभाषराव शिंदे, सत्यजित पाटणकर, बाळासाहेब सोळसकर, प्रदीप विधाते, सारंग पाटील, सुनील माने आदींसह प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांनी केले. त्यानंतर लगेचच अजित पवार यांनी या सर्व नेत्यांसोबत बैठक घेत खलबते केली.

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर अजित पवार कोरेगाव मतदारसंघातील काही गावांमध्ये कार्यक्रमासाठी दोन तीन वेळा येऊन गेले होते; परंतु कोरेगावात येणे मात्र त्यांनी टाळले होते. या पार्श्वभूमीवर ते प्रदीर्घ कालावधीनंतर आज कोरेगावात आले होते. मुख्य कार्यक्रमापूर्वी ते आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. याठिकाणी त्यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेऊन खलबते केली. सुमारे तासभर ही बैठक सुरू होती. मात्र, या बैठकीत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबतचा तपशील समजू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China agreement : भारत-चीन करारामुळे नेपाळ संतप्त, डिप्लोमॅटिक नोट पाठविण्याची तयारी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 ऑगस्ट 2025

Israel War On Gaza: गाझातील इस्राइल करीत असलेला नरसंहार त्वरित थांबवा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

गोष्ट एका ‘शिदोरी’ची

बोलताना ठेवा भान

SCROLL FOR NEXT