Mahesh Shinde vs Shashikant Shinde
Mahesh Shinde vs Shashikant Shinde esakal
सातारा

Mahesh Shinde : 'दुसऱ्याच्या मांडीवर शड्डू ठोकून पैलवान होता येत नाही, तुमची औकात पुन्हा दाखवून देऊ'

पांडूरंग बर्गे

येत्या पाच ते सहा महिन्यांत अथवा अगदी दोन महिन्यांतही तालुक्यासाठी एक आनंदाची बातमी केंद्र सरकार जाहीर करेल. त्यातून तालुक्यातील किमान एक ते दीड लाख युवकांना रोजगार अर्थात नोकरी मिळेल.

कोरेगाव : बाजार समिती निवडणुकीत (Koregaon Bazar Samiti Election) तालुक्यातील केवळ 22 सोसायट्या आणि सुमारे दीडशे मते आमच्याकडे होती, तरी आम्ही 477 मतांवर पोचलो. मग मते आमची फुटली, की तुमची? तर मते तुमची फुटली, असे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले.

येथील सुभाषनगरातील सुमारे दहा कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे लोकार्पण, जुना मोटर स्टँड ते डी. पी. भोसले कॉलेज रस्ता सुशोभीकरण कामाचा प्रारंभ व शहरातील विविध दहा समाजघटकांना आपापल्या समाजासाठी मंदिर, समाजमंदिर, सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी प्रत्येकी चार गुंठे जागेचे वितरण अशा संयुक्त समारंभात आमदार शिंदे (Mahesh Shinde) बोलत होते.

या वेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल प्र. बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, नियोजन समितीच्या सभापती वनमाला बर्गे, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती शीतल बर्गे, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती संगीता ओसवाल यांच्यासह पदाधिकारी, आजी- माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.

आमदार शिंदे म्हणाले, ‘‘कोरेगाव बाजार समिती अडचणीत होती. म्हणून म्हटले होते बिनविरोध करूया, तरी निवडणूक लावली गेली. बर निवडणूक कोणती होती हेही लक्षात घ्या. सोसायट्या तुमच्या, मते तुमची, सभासद तुमचेच. साधे सभासदत्व तुम्ही कित्येक शेतकऱ्याना होऊ दिलेले नाही. त्यात बाजार समितीसाठी कऱ्हाड आणि फलटण मतदारसंघातील बरीच गावे होती. या गावांची आमची ओळखही नव्हती, तरी आम्ही ४७७ मतांवर पोचलो.’’

दुसऱ्याच्या मांडीवर शड्डू ठोकून पैलवान होता येत नाही. आपल्या मतदारसंघात येऊन जनतेच्या मैदानात येऊन मग शड्डू ठोका. तुमची औकात पुन्हा दाखवून देऊ. मात्र, यापुढे तालुका म्हणून विकासकामे करावी लागतील, याची आपण सर्वांनी खूणगाठ बांधूया, असेही आमदार शिंदे म्हणाले.

कोरेगाव शहर विकास आराखडा आणून तो मंजूर केला. हा आराखडा शहरातील जनतेच्या हिताचा म्हणून मंजूर केला. त्यात कोणावर अन्याय झाला असेल तर तो अन्याय आपण येत्या महिन्याभरात दूर करू, असा आपला शब्द आहे. त्यावर अधिकाऱ्यांशी सर्व चर्चा झाली आहे. सर्वांनी निश्चित राहावे, असे सांगून आमदार शिंदे म्हणाले, ‘‘तालुक्यात बेरोजगारीचा प्रश्न आहे. तो सोडवायला हवा असे कोणी तरी म्हणाले.

आपण त्याबाबत जागरूक आहोत. केल्याशिवाय काही बोलायचे नाही, अशी माझी पद्धती आहे. येत्या पाच ते सहा महिन्यांत अथवा अगदी दोन महिन्यांतही तालुक्यासाठी एक आनंदाची बातमी केंद्र सरकार जाहीर करेल. त्यातून तालुक्यातील किमान एक ते दीड लाख युवकांना रोजगार अर्थात नोकरी मिळेल.’’ कोरेगाव भाग सोसायटीचे अध्यक्ष रामचंद्र बर्गे, डॉ. महेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. उपनगराध्यक्ष सुनील बर्गे यांनी प्रास्ताविक केले. संतोष नलावडे यांनी स्वागत आणि सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: कुलदीप यादवचा राजस्थानला दुहेरी धक्का! एकाच षटकात दोन फलंदाजांना धाडलं माघारी

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT