Mahesh shinde criticized Shashikant Shinde Sakal
सातारा

शशिकांत शिंदेंचे नेतृत्व टेस्ट ट्यूब बेबीसारखे: आ.महेश शिंदे

शशिकांत शिंदेंचे (Shashikant Shinde) नेतृत्व टेस्ट ट्यूब बेबीसारखे असल्याची टीका साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी केली.

सकाळ डिजिटल टीम

कोरेगाव, ता. १९ : ‘स्थानिक जनतेला स्थानिकच उमेदवार हवाय, हे या निवडणुकीच्या निकालाने सिद्ध केले असून, शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) हे राज्यातील मोठे नेतृत्व असल्याने त्यांनी राज्यातच थांबावे. हे टेस्ट ट्यूब बेबीसारखे तयार झालेले नेतृत्व आहे. आम्हा स्थानिकांच्या नादी लागून त्यांची अशीच अवस्था होणार आहे,’ अशा शब्दांत आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी शशिकांत शिंदे यांची संभावना केली.

नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. ‘मुंबईतून यायचं, ताजमहाल, विमानतळ बांधतो म्हणायचं, माणसे एकदा-दोनदा गंडतील, आता गंडायला रिकामी नाहीत,’ असा टोला लगावत आमदार महेश शिंदे म्हणाले, ‘‘कोरेगावच्या जनतेने सकारात्मक निर्णय घेऊन विकासाला मत दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आमचे नेते एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. ही निवडणूक आम्ही महायुतीतून लढलो आणि चांगल्या पद्धतीचे यश मिळाले. त्याबद्दल जनतेला मन:पूर्वक धन्यवाद देतो.’’ या निवडणुकीत शिवसेनेचे (Shivsena) पॅनेल नव्हते, असे सांगितले जाते, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीने पहिल्यांदा आमच्याशी गद्दारी करून जिल्हा बँकेत आम्हाला जाणीवपूर्वक डावलूनही आमच्या शिवसेनेच्या तीन जागा निवडून आल्या. विधानसभेला ज्या पद्धतीने आम्ही लढलो. त्याच पद्धतीने कोरेगाव शहरात आम्ही महायुतीतून लढलो. हे सगळे श्रेय महायुतीचे आहे. विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांनी जो विकास केला. त्यामुळे हे श्रेय त्यांचेच आहे.’’

दरम्यान, निकालाच्या आदल्या दिवशी प्रतिक्रिया देताना कोरेगाव नगरपंचायतीत निश्चित सत्ता परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करून ते म्हणाले होते, की राष्ट्रवादी त्यांच्या फायद्याच्या ठिकाणी आम्हाला आम्हाला बरोबर घेणार नसेल, तर आम्ही आमच्या फायद्याच्या ठिकाणी त्यांना का बरोबर घ्यावे. आम्ही काँग्रेसला सोबत घेऊन चाललो असून, कायम काँग्रेसला सोबत घेऊन जाऊ. काही ठिकाणी शिवसेना व काही ठिकाणी सहयोगी पक्ष, असे आम्ही या ठिकाणी काम करत आहोत.’’ ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना शंभर टक्के हद्दपार केले जाणार, हे निश्चित आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT