karad 
सातारा

आश्‍लेषा नक्षत्रात संततधार; कऱ्हाडातील या भागातील तलाव तुडुंब

जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) ः दक्षिणेतील डोंगरी भागात गेल्या आठवड्यापासून संततधार पडणाऱ्या पावसाने डोंगरी भागाचा पावसाचा बॅकलॉग भरून काढला असून येणपे, उंडाळे, घोगाव व जिंती तलाव तुडुंब भरून ओसंडून वाहू लागले आहेत. 

मॉन्सूनच्या सुरवातीला मृग नक्षत्रात पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. या पावसाने पिकांची उगवण झाली व डोंगरी भागाने हिरवाईचा शालू परिधान केला. मात्र, दरम्यानच्या काळात मॉन्सूनच्या पावसाने दडी मारली व चक्रीवादळ होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने पुन्हा मुसंडी मारली. त्यामध्ये पावसापेक्षा वादळी वाऱ्याने ऊस पीक शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन ऊस अक्षरशः भुईसपाट झाले, तर मका व इतर कडधान्यांची हानी झाली. 

काही नक्षत्रांत पाऊस कमी-जास्त पडला. मात्र, गेल्या आठवड्यापासून आश्‍लेषा नक्षत्राचा सतत संततधार, तर कधी धो-धो पाऊस पडत असून डोंगरांना पाझर फुटले आहेत. डोंगर पाझरू लागल्याने ओहळ, ओढे, शेततळी व नाले तुडुंब भरून वाहू लागले. डोंगरी भागासाठी वरदायी असणारे येणपे, उंडाळे, येळगाव, घोगाव, जिंती तलाव तुडुंब भरून ओसंडून वाहू लागले आहेत. येवती तलाव भरण्याच्या उंबरठ्यावर आहे. 

हा पाऊस भात, सोयाबीन, भुईमूग व इतर कडधान्य पिकांच्या वाढ व भरण्यासाठी उपयुक्त असल्याने शेतकरी सुखावला असला तरी एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू पाहावयास मिळत आहेत. वादळी वाऱ्यामुळे ऊस पीक शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. एकंदरीत गत आठवड्यापासून संततधार पडणाऱ्या पावसाने कऱ्हाड दक्षिणेतील डोंगरी भागाचा बॅकलॉग भरून काढल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘NO REFUND, NO EXCHANGE’ बोर्ड लावला म्हणून पैसे परत मिळणार नाहीत? वस्तूमध्ये प्रॉब्लेम आल्यास ग्राहक काय करू शकतो? पाहा

ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Ladki Bahin Yojana 1800 Viral Claim : लाडकी बहीण योजनेत मिळणार 1800 रुपये? सोशल मीडियावरील 'तो' दावा दिशाभूल करणारा; DGIPR कडून फॅक्टचेक

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Dino Morea: मिठी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची 8 तास चौकशी, जबाब नोंदवून सोडलं; चौकशीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT