Malin Village esakal
सातारा

म्हारवंडला भूस्खलनाचा धोका; 'माळीण'सारख्या दुर्घटनेची शक्यता?

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (सातारा) : अतिदुर्गम क्षेत्रात वसलेल्या म्हारवंड Mharwand (ता. पाटण) या गावाला गत काही वर्षांपासून भूस्खलनाचा धोका उभा राहिला आहे. दर पावसाळ्यात (Heavy Rain) येथील नागरिक भूस्खलनाच्या (Landslide) दहशतीत जीव मुठीत घेऊन राहतात. ही टांगती तलवार कायमस्वरूपी हटविण्याची गरज असताना प्रशासन केवळ तात्पुरती सोय करून हात झटकत आहे. येथील गंभीर स्थितीकडे होणारे दुर्लक्ष गावाला माळीणच्या दुर्घटनेकडे सरकवत असल्याचेच जाणवत असल्याने प्रशासन म्हारवंडचे माळीण (Malin Village) होण्याचीच वाट बघतेय की काय, असा आक्रोशपूर्ण सवाल ग्रामस्थ विचारात आहेत. (Landslide Threat To Mharwand Village In Tarle Satara Marathi News)

अतिदुर्गम क्षेत्रात वसलेल्या म्हारवंड (ता. पाटण) या गावाला गत काही वर्षांपासून भूस्खलनाचा धोका उभा राहिला आहे.

सह्याद्री डोंगररांगांच्या (Sahyadri mountain) कुशीत अतिदुर्गम ठिकाणी म्हारवंड वसले आहे. सुमारे ८८ कुटुंबांत मिळून चार-पाचशे जनता वास्तव्य करते. संपूर्ण गाव डोंगराच्या मोठ्या कड्याखाली आहे. येणारा प्रत्येक पावसाळा थरकाप उडविणारा असतो. कारण भूस्खलनाचा कालसर्प त्यांना गिळण्यास आतुर झाल्याचे तेथील भौगोलिक परिस्थितीवरून जाणवत आहे. दरवर्षी प्रशासकीय अधिकारी येथे भेट देऊन पाहणी करून तात्पुरत्या उपाययोजना करण्यातच धन्यता मानत आले आहेत.

पावसाळ्‍यासाठी गतवर्षी निवारा शेड उभारण्यात आली. मात्र, मूलभूत सोयी-सुविधा न देता मॉन्सूनच्या (Monsoon) तोंडावर घाईघाईने महसूल विभागाने जबरदस्तीने ताबा लोकांना घ्यायला लावून अधिकारी वर्ग सोपस्कार पूर्ण केल्याच्या समाधानात मोकळा झाला. परंतु, तेथे वीज, पाणी, शौचालय, रस्ता आदींची सोय करणार कोण? या पत्र्याच्या निवारा शेडमध्ये धों..धो पावसात व सोसाट्याच्या वाऱ्यात राहायचे कसे? पावसाळ्यातील हाडे गोठविणाऱ्या येथील थंडीत अधिकाऱ्यांनी एक रात्र या शेडमध्ये राहून दाखवावे, असेही अनेकजण बोलून दाखवत आहेत.

Monsoon

तहसीलदार योगेश्वर टोंपेंकडून ग्रामस्थांना आशा

प्रशासनाने यावर अभ्यास करून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. खास बाब म्हणून यांना कायमस्वरूपी घरे बांधून पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व पर्याय तपासून घेऊन येथील पुनर्वसन करवून घेणे हे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यासमोर खरे आव्हान आहे. येथील संवेदनशील तहसीलदार योगेश्वर टोंपे (Tehsildar Yogeshwar Tompe) यांच्याकडून ग्रामस्थांना आशा आहे. अन्यथा एक दिवस म्हारवंडचे माळीण होण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही.

Landslide Threat To Mharwand Village In Tarle Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Year Ender 2025: हत्तींचं स्थलांतर, बिबट्यांची दहशत अन् कुत्र्यांचा वाद… 'हे' वर्ष वन्यजीवांसाठी इतकं हादरवणारं का ठरलं?

Railway News: रेल्वेमध्ये पॉइंट्समन, गेटमन, ट्रॅकमनची कमतरता...; माजी सैनिक मैदानात उतरणार, प्रशासनाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update: अॅडव्होकेट प्रशांत पाटील यांनी बारामती सत्र न्यायालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने लावली हजेरी

Thane Water Supply: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुन्हा जलवाहिनी फुटल्याने मोठे नुकसान, ५० टक्के पाणीकपात; कधीपर्यंत? जाणून घ्या...

Kolhapur Youth Addiction : ब्रेडला बाम, रुमालात व्हाईटनर अन् स्नेक बाईटपर्यंत मजल; ग्रामीण तरुणाई नशेच्या गर्तेत

SCROLL FOR NEXT