Patan Taluka Landslide
Patan Taluka Landslide esakal
सातारा

दहा हजार जणांवर स्थलांतराची वेळ

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : भूस्खलनासह मुसळधार पावसाने (Heavy Rain in Patan Taluka) झालेल्या हानीमुळे पाटण तालुक्यातील ५२ गावे बाधित (Patan Taluka Landslide) झाली आहेत. ५२ गावांतील तब्बल दोन हजार ३६४ कुटुंबांतील दहा हजार १३६ लोकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. त्याशिवाय तालुक्यातील सात गावांतील ९२० कुटुंबे केवळ रस्ता तुटल्याने संपर्कहीन झाली आहेत. त्या सगळ्यांना लवकरात लवकर सुविधा पुरवण्याचे शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. हे आव्हान पेलताना प्रशासनाची दमछाक होते आहे. मोरणा, कोयना, ढेबेवाडी- वाल्मीकी, तारळे आदी खोऱ्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. (Landslides In 52 Villages Of Patan Taluka bam92)

भूस्खलनासह मुसळधार पावसाने झालेल्या हानीमुळे पाटण तालुक्यातील 52 गावे बाधित झाली आहेत.

पाटण तालुक्यात गुरुवारी भूस्खलनासहीत मुसळधार पावसाने दाणादाण उडवली. तालुक्यातील पाच गावे त्यात मोठ्या प्रमाणात बाधित ठरली. त्यात आंबेघर, मिरगाव, ढोकावळे (Ambeghar Mirgaon Dhokavale Landslide) येथील ३० जणांचा मृत्यू झाला. या तीन गावांसहीत वरवंडेवाडी, वरचे घोटील आदी गावांचे प्रलयात अतोनात नुकसान झाल्याने त्या गावातील तब्बल ५२२ कुटुंबांचे कायमचे स्थलांतर करावे लागणार आहे. त्यादृष्टीने शासन आराखडा करत आहे. त्या सगळ्या गावांना सावरण्यासाठीही आजअखेर अनेकांनी हातभार लावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis), विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आदींनी त्या भागात पाहणी करून कामांना गती देण्याचे व त्यांच्या कायमच्या पुनर्वसनाचे आश्वासन दिले आहे.

मुसळधार पावसासह भूस्खलनाच्या प्रलयात पाटणमधील ५२ गावे बाधित झाली आहेत. त्यात सर्वाधिक जास्त फटका वरचे आंबेघरच्या १७३ कुटुंबांतील ६५० तर त्या खालोखाल मिरगावच्या १२० कुटुंबांतील ४८० लोक बाधित आहेत. तालुक्यातील ५२ पैकी सात गावांना रस्ता तुटल्याचा थेट फटका बसला आहे. मोरणा, कोयना, तारळे व ढेबेवाडी-वाल्मीकी खोऱ्यातील गावांना जास्त फटका बसला आहे. मिरगाव, ढोकावळे, पुनवली, रिसवड आदी गावांना जाण्यासही रस्‍ता नाही.

सात गावांतील ९२० कुटुंबे आजही संपर्कहीन

रस्ता तुटल्याचा सात गावांना फटका बसला आहे. नवजासहीत वरंवडेवाडी, कामरगाव, डिचोली, मानाईनगर, झाकडे व किल्ले मोरगिरी आदी गावांचा त्यात समावेश आहे. सातही गावांतील ९२० कुटुंबांतील तीन हजार ५३१ ग्रामस्थांना काहीच मदत पोचू शकत नाही, अशी स्थिती आहे. त्या गावांचा बाजारपेठेशीही संपर्क तुटला आहे. रस्ता तुटल्याने किंवा रस्त्यात दरड कोसळ्याने संपर्कहीन झाली आहेत. त्या भागातील रस्ते ७२ तासांत करण्याचे आदेश गृहराज्‍यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. तरीही त्याकडे बांधकाम विभागाने फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही.

Landslides In 52 Villages Of Patan Taluka bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT