Corona Vaccine Sakal
सातारा

सातारा जिल्ह्याला मिळाले 1 लाख 82 हजार डोस

लसीकरण मोहिम गती घेणार

प्रशांत घाडगे

राज्यभरात लसीकरण मोहिमेत सातारा जिल्हा अग्रेसर ठरत आहे.

सातारा: राज्यभरात लसीकरण मोहिमेत सातारा जिल्हा अग्रेसर ठरत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक लस काल कोव्हिशिल्ड एक लाख ७० हजार, तर कोव्हॅक्सिनचे बारा हजार ४८० डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आज (शुक्रवार) मोठ्या प्रमाणात लसीकरण होणार आहे. या मोहिमेसाठी लसीकरण सत्रांचीही संख्या ३५० हून अधिक ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यात एक जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात झाली. सुरवातीच्या तीन ते चार महिन्यांत लशीचे डोस मोठ्या संख्येने उपलब्ध होत होते. त्यानंतर लशींचे डोस कमी येण्यास सुरवात झाल्याने मोहिम मंदावली होती. मात्र, मागील तीन महिन्यांपासून लशींची संख्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने मोहिमेला वेग येत आहे.

लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्वाधिक एक लाख ४७ हजार लस जिल्ह्याला उपलब्ध झाली होती. त्यानंतर काल सर्वाधिक सुमारे पावणेदोन लाख लशींचे डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्राकडून राज्याला लशीचे डोस जादा प्रमाणात उपलब्ध झाल्याने जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात लस मिळाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई व कोरेगाव या पाच शहरात ऑनलाइन नोंदणीनुसार, तर इतर ठिकाणी टोकन पद्धतीने लसीकरण प्रक्रिया होणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्याला लशींचे डोस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने आरोग्य केंद्रावर योग्य नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी लसीकरण सत्रांचीही संख्या वाढविण्यात आली असून, पुढील काळातही जिल्ह्याला जास्तीतजास्त लशींचे डोस मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

- डॉ. प्रमोद शिर्के; नोडल अधिकारी, लसीकरण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

IND vs PAK Final: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात OUT केलं अन् सैम अयूबने केला विचित्र जल्लोष! VIDEO व्हायरल; भारतीय चाहते संतापले? नेमकं काय केलं?

Nagpur Garage Fire: नोकरीवरून काढल्याच्या रागातून गॅरेजला आग!; २० दुचाकी जळाल्या; माजी कर्मचाऱ्यावर संशय, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

वीर पहाडियाचा रोमँटिक अंदाज, आफिया सय्यदचं पदार्पण; ‘प्रेम कीटाणू’ ठरतोय तरुणाईचा सिनेमा?

SCROLL FOR NEXT