Leopards esakal
सातारा

बिबट्याने झाडावर बसून शेळी केली फस्त; ग्रामस्थांत घबराट

धामणीच्या भरवस्तीतील घटना; हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू, ग्रामस्थांत घबराट

राजेंद्र पाटील

ढेबेवाडी (सातारा) : भरवस्तीतील जनावरांच्या शेडात घुसून बिबट्याने दोन शेळ्यांना ठार केले आणि जवळच्याच झाडावर फरफटत नेऊन त्यातील एक शेळी फस्त केली. धामणी (ता. पाटण) येथे काल रात्री ही घटना घडली. दरम्यान, ढेबेवाडी-पाटण मार्गावरील (Dhebewadi-Patan Road) दिवशी घाटाच्या (Divashi Ghat) सुरवातीलाच असलेल्या सुतारवाडी फाट्यावरील फरशी पुलाच्या कठड्यावर बसलेल्या बिबट्याला (Leopards) बघून काल रात्री वाहनचालकांची घाबरगुंडी उडाली.

भरवस्तीतील जनावरांच्या शेडात घुसून बिबट्याने दोन शेळ्यांना ठार केले.

विभागात बिबट्याचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या महिनाभरात अनेक शेळ्या व कुत्र्यांचा त्याने फडशा पाडला असून, लोकवस्तीत बिबट्याचे दर्शन घडत असल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. धामणी येथील कुंभारवाड्यात भक्ष्याच्या शोधार्थ आलेल्या बिबट्याने गणपती कुंभार यांच्या भरवस्तीत असलेल्या जनावरांच्या शेडमध्ये घुसून एका शेळीला जागेवरच ठार केले तर दुसऱ्या शेळीला तेथून पळवून नेले. आज सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्याबाबत कळविण्यात आले. वनपाल सुभाष राऊत, वनरक्षक विशाल डुबल, मुबारक मुल्ला आदींनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. जवळच असलेल्या झाडावर शेळीचे अर्धवट खाल्लेले अवयव आढळल्याने बिबट्याने झाडावर बसून शेळी फस्त केल्याचे स्पष्ट झाले.

दिवशी घाटातही वाहनचालकांची घाबरगुंडी

ढेबेवाडी-पाटण मार्गावरील दिवशी घाटाच्या सुरुवातीलाच असलेल्या सुतारवाडी फाट्याजवळच्या झाडीत बिबट्याचा अनेक दिवसांपासून मुक्काम आहे. आतापर्यंत अनेक जणांना तेथील रस्त्यावर त्याचे दर्शन झाले आहे. आठवड्यापूर्वीच काही वाहनचालकांनी बिबट्याला मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले होते. काल रात्री आठच्या सुमारास फाट्याजवळ फरशी पुलाच्या कठड्यावर बसलेला बिबट्या बघून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची तारांबळ उडाली. रात्री ड्युटीवरून घरी परतत असताना कठड्यावर बसलेल्या बिबट्याला बघून भीतीने घाम फुटला, माझ्यासह अनेक वाहनचालकांची अशीच गत झाली होती, असे प्रत्यक्षदर्शी मालदनचे राजू कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

ऊसतोड मशीनमध्ये सापडून महिलेचा दुर्दैवी अंत; संक्रट्टी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, हा भयंकर अपघात पाहून...

Pune News : काय सांगता? पुण्यात नगरसेवक पदासाठी चक्क १ कोटीची बोली...नेमका कुठं घडला प्रकार?

Tamhini Ghat Accident : प्रगतीची भरारी राहिली अर्धवट; अपघातानंतर कोंढवे धावडे, कोपरे परिसरात शोककळा

Latest Marathi News Live Update : तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आज मालेगाव बंद

SCROLL FOR NEXT