Leopard Forest Department esakal
सातारा

Forest Department : विहिरीत पडला बिबट्याचा बछडा; सुखरूप बाहेर काढण्यासाठी वन विभागाकडून 'रेस्क्यू ऑपरेशन'

बिबट्याचा (Leopard) बछडा विहिरीत पडल्याची घटना आज (शनिवार) सकाळी उघडकीस आली.

हेमंत पवार

गमेवाडी परिसरात तीन ते चार बिबट्या असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला यापूर्वीच दिली आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

कराड : बिबट्याचा (Leopard) बछडा विहिरीत पडल्याची घटना आज (शनिवार) सकाळी उघडकीस आली. ग्रामस्थांनी त्याची माहिती वनविभागाला दिली असून वन विभागाकडून (Forest Department) बछड्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

गमेवाडी येथील बोडका नावाच्या शिवारातील उत्तम जाधव यांची ही विहीर आहे. त्या विहिरीत बछडा पडला. आज सकाळी उत्तम जाधव यांचे बंधू दादासाहेब जाधव हे सकाळी शेतात गेल्यावर त्यांच्या विहिरीत बछडा पडला असल्याचे लक्षात आले.

त्यांनी तातडीने वन सेवक मयूर जाधव, उत्तमराव जाधव व पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून वन विभागाकडून संबंधित बछड्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

बिबट्याचा वावर आधोरेखित

गमेवाडी परिसरात तीन ते चार बिबट्या असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला यापूर्वीच दिली आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आज बिबट्याचा बछडा विहिरीत पडल्यावरून बिबट्याचा त्या भागातील अधिवास असल्याचे अधोरेखित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT