सातारा

जावळी तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी चिंतेत

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : शहरीकरणामुळे वन्यजीवांचे क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे वन्य आणि मानवातील संघर्ष वाढला आहे. वन्यप्राण्यांकडून मानवाच्या व मानवांकडून वन्यप्राण्यांच्या हत्या होत आहेत. वाढत्या वृक्षतोडीमुळे जंगलाचा ऱ्हास होत आहे. याचा पर्यावरणारही परिणाम होत आहे. जंगलातील पशु-पक्षी व अन्य कीटक यांना निसर्ग त्यांच्या गरजेप्रमाणे अन्न देत असतो. त्यासाठी त्या प्राण्यांची काळजी, रक्षण निसर्गच करतो. आजच्या मानवाला आहाराबरोबर इतर चैन याचा विचार करावा लागतो. हे करीत असताना निसर्ग ऱ्हास पावत आहे. याचा विचार फारच थोडे लोक करत आहेत.

आज बिबट्याचा मुक्त संचार मानवीवस्तीकडे होताना दिसत आहे. कारण, मानवाकडून झालेली जंगलतोड, वृक्षतोड, जंगलामध्ये झालेलं अतिक्रमण यामुळे वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे वाटचाल पाहायला मिळत आहे. केळघर परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार होत असून पाळीव प्राणी, श्वानावर हल्ला करुन भक्ष करीत असल्याने नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. केळघर घाटात बिबट्या मुक्तपणे संचार करत असल्याने रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

बुधवारी (ता. 27) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वरोशी येथील शेतकऱ्याला बिबट्या रानात फिरताना दिसला. बिबट्याचा आवाज आल्याने या शेतकऱ्याने आपली जनावरे रानातून हलवल्याने अनर्थ टळला आहे. वरोशी येथील अनेक शेतकरी केळघर घाटात असलेल्या डोंगरावरील रानात जनावरे चारण्यासाठी घेऊन जात असतात. यापूर्वीही या परिसरात बिबट्या मुक्तसंचार करत असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले आहे.

पाऊस उघडल्याने अन्नाच्या शोधात बिबट्या लोकवस्तीकडे येत असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. वरोशी येथे गेल्या वर्षी बिबट्याने चरायला गेलेल्या जनावरांवर हल्ला केला होता. शेतकऱ्यांना वरोशी गावच्या हद्दीत बिबट्या दिसून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT