सातारा

उदयनराजे म्हणतात हा काळ कठीण असला तरी...

उमेश बांबरे

सातारा : आजपर्यंत लोकांना केंद्रस्थानी ठेऊनच काम करत आलो आहे. पद नसताना समाजकारणच केले. राजकारण कधीच केले नाही. गेल्या तीस वर्षांत समाजाची जेवढी सेवा करता येईल तेवढी केली. आता राज्यसभेच्या संधीचा पुरेपूर लोकहितासाठी वापर करेन. केवळ साताराच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करीत राहणार आहे, असा विश्‍वास भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
तुम्ही सांगली, कोल्हापूर, कऱ्हाड प्रवास करीत असाल तर हे वाचा
 
दिल्लीत राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात बुधवारी (ता.22) खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. ते म्हणाले, ""कोरोनाचा कठीण काळ असला, तरी घरी थांबून चालणार नाही. आतापर्यंत लोकांना केंद्रस्थानी ठेऊनच काम करत आलो आहे. पद नसताना समाजकारण केले. राजकारण कधीच केले नाही. गेल्या तीस वर्षांत समाजाची जेवढी सेवा करता येईल तेवढी केली. राज्यसभेच्या या संधीचा पुरेपूर लोकहितासाठी वापर करणार आहे. केवळ सातारा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करीत राहीन.''

अकरा हजारांपैकी केवळ एकशे पंधरा लाेकांनीच स्विकारली नोकरी; असे का बरं घडले

नाे एन्ट्री...अन्यथा तुम्हांला या गावात श्री शंभू महादेवाचे दर्शन पडेल हजार रुपयांना

कोरोनाविषयी बोलताना ते म्हणाले, की कोरोनावर लवकरात लवकर लस निघाली पाहिजे. लॉकडाउनमुळे लोकांचे रोजगार हिरावले आहेत. लोकांना घरात बसून राहा, असे फार काळ सांगता येणार नाही. असे वारंवार सांगितले, तर उद्या कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन हा प्रश्‍न ऐरणीवर येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
Edited By : Siddharth Latkar 

पवारसाहेबांना विचारा ते समाेरच हाेते; चुकीच्या गाेष्टींना मी थारा देत नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT