lok sabha election udayanraje bhosale target karad patan tehsil for vote bank politics
lok sabha election udayanraje bhosale target karad patan tehsil for vote bank politics Sakal
सातारा

Satara News : दगाफटका टाळण्यासाठी खासदार उदयनराजेंकडून कऱ्हाड, पाटण दौरा सुरु

हेमंत पवार

सातारा : लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारीच्या अनेक याद्या जाहीर झाल्या. निवडणुकीसाठी कालपासुन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. मात्र तरीही खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही.

मात्र मी लोकसभेचा उमेदवार म्हणूनच लोकांशी संवाद साधत आहे असे जाहीर करुन खासदार भोसले यांनी जिल्ह्यात संपर्क दौरा सुरु केला आहे. त्याअंतर्गत त्यांनी मागील लोकसभा निवडणुकीत कमी मते मिळालेल्या कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे.

संपर्काअभावी मागीलवेळी झालेली चुक यावेळी टाळण्यासाठी खासदार भोसले यांनी मायक्रो प्लॅनींग करुन कऱ्हाडचे दोन्ही मतदार संघ आणि पाटणसाठी मास्टर प्लॅन केला आहे. त्यातच त्यांनी सलग तीन-चार दिवस कऱ्हाड, पाटणचा दौरा सुरु ठेवला. दोन्ही तालुक्यातील घसरलेला मताचा टक्का वाढवण्यासाठी सध्या खासदार भोसलेंच्या रडारवर दोन्ही तालुके आहेत.

सातारा जिल्ह्याची ओळख राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला अशी राहिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासूनच या जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड आहे. गेल्या दोन पंचवार्षिक छत्रपती उदयनराजे भोसले हेच राष्ट्रवादीकडून खासदार म्हणून निवडून गेले होते.

तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्यावरही उदयनराजे भोसले विजयी झाले. पण त्यानंतर त्यांनी काही महिन्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये गेले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत खासदार उदयनराजे आणि श्रीनिवास पाटील अशी लढत झाली.

त्यामध्ये खासदार पाटील हे विजयी झाले आणि खासदार भोसले यांना पराभवाला सामोरे जावे लागले. खासदार पाटील यांच्या मतामध्ये कऱ्हाड उत्तर, दक्षिण आणि पाटण मतदार संघाचा वाटा मोठा होता. त्यामुळे खासदार भोसले यांनी या तिन्ही मतदार संघात भेटीगाठीवर जोर दिला आहे. त्यासाठी त्यांनी मायक्रो प्लॅनींगही केले आहे.

कऱ्हाड, पाटणनेच खासदार पाटलांना तारले खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देवून भाजपमध्ये प्रवेश करून त्या पक्षातून निवडणूक लढवली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार श्रीनिवास पाटील हे निवडणूक रिंगणात होते.

खासदार पाटील यांनी खासदार भोसले यांचा ८७ हजार ७१७ मतांनी पराभव केला. या चुरशीच्या लढतीत खासदार पाटील यांना ६ लाख ३६ हजार ६२० तर खासदार भोसले यांना ५ लाख ४८ हजार ९०३ मते मिळाली.

कऱ्हाड उत्तरने खासदार पाटील यांना सर्वाधिक ५० हजार ८७९ मतांची सर्वाधिक आघाडी दिली. कऱ्हाड उत्तरमध्ये खासदार पाटील यांना १ लाख १४ हजार ६४१ तर खासदार भोसले यांना ६३ हजार ७६२ मते मिळाली. कऱ्हाड दक्षिणमध्ये खासदार पाटील यांना ३१ हजार ८४९ मतांची आघाडी मिळाली होती.

पाटील यांना १ लाख १३ हजार ५५० तर खासदार भोसले यांना ८१ हजार ७०१ मते मिळाली. पाटण मतदार संघामध्ये खासदार पाटील यांना २७ हजार ८५९ मतांचे मताधिक्य मिळाले. पाटील यांना १ लाख १२ हजार ३४८ तर खासदार भोसले यांना ८४ हजार ८५९ मते मिळाली. त्यामुळे खासदार पाटील यांना कऱ्हाड-पाटण तालुक्यांनी तारले होते. त्याचा विचार करुन खासदार भोसले यांनी मताधिक्य वाढवण्यासाठी संबंधित दोन्ही तालुके टार्गेट केले आहेत.

कऱ्हाड-पाटण मतदासंघ ठरतात निर्णायक

कऱ्हाड तालुक्यात उत्तर आणि दक्षिण हे दोन मतदार संघ आहेत. त्याचबरोबर त्याला लागुनच पाटण विधानसभा मतदार संघ आहे. यातील कऱ्हाड दक्षिण मतदार संघात दोन लाख ९८ हजार ३०३, उत्तरमध्ये दोन लाख ९३ हजार १५४ आणि पाटण मतदार संघात दोन लाख ९७ हजार ५७१ असे तिन्ही मतदार संघात आठ लाख ८९ हजार २८ मतदार आहेत.

कऱ्हाड-पाटण तालुक्यातील उमेदवार असेल तर तालुक्याचा विचार करुन मतदार संबंधित उमेदवाराला मतदान करतात. त्यामुळे या तिन्ही मतदार संघावरच उमेदवारांचा विजय ठरतो असे यापुर्वीच्या निवडणुकीतील चित्र होते. त्यामुळे या मतदार संघावरच सर्वांची भिस्त असणार आहे.

तिन्ही मतदार संघाची मतदार संख्या

  • कऱ्हाड दक्षिण - दोन लाख ९८ हजार ३०३

  • कऱ्हाड उत्तर - दोन लाख ९३ हजार १५४

  • पाटण मतदार संघ - दोन लाख ९७ हजार ५७१

  • एकुण मतदार - आठ लाख ८९ हजार २८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT