Ramdas athawale statement about lok sabha election nashik news Esakal
सातारा

Loksabha Election : सातारा लोकसभेसाठी भाजपने 'या' नेत्याला तिकीट द्यावं; रामदास आठवलेंनी नावंच केलं जाहीर

आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती ४५ जागा जिंकेल, असा दावा करून देशात चारशे पारचा नारा मोदीजींनी दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधी यांनी देश जोडण्याऐवजी स्वत:चा पक्ष जोडण्याचे काम करावे. देशभर फिरून त्यांना काहीही फायदा होणार नाही.

सातारा : मराठा समाजाला (Maratha Community) सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांच्या आरक्षणाचा विषय क्लिअर झाला आहे. त्यामुळे मनोज जरांगे- पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी आंदोलनाची भाषा करू नये. शांततेने मराठा समाजाचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केली. सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना भाजपकडून तिकीट मिळावे, अशी आपली अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चर्मकार समाजाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या वधूवर मेळाव्यासाठी केंद्रीय मंत्री आठवले काल साताऱ्यात आले होते. या वेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे (Republican Party) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे आदी उपस्थित होते.

मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) मंत्री आठवले म्हणाले, ‘‘मराठा समाजाला सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे गती आली होती; पण सरकार आरक्षण देणार होते. आता विषय क्लिअर झाला आहे. त्यामुळे मनोज जरांगेंनी आंदोलनाची भाषा करू नये, शांततेने मराठा समाजाचे नेतृत्व करावे, ही आमची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाविरोधात याचिका दाखल झाली असली, तरी सरकारने निर्णय घेतला आहे. लोकशाहीत सरकारला अधिकार आहे. हे आरक्षण सगळ्यांना नसून आठ लाखांच्या आत उत्पन्न असलेल्यांना आहे. ओबीसींनाही तसेच आरक्षण आहे. न्यायालयात आमच्या सरकारच्या बाजूने चांगली बाजू मांडली जाईल. त्यामुळे टिकणारे आरक्षण मिळेल, यात शंका नाही.’’

आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती ४५ जागा जिंकेल, असा दावा करून देशात चारशे पारचा नारा मोदीजींनी दिला आहे; पण काँग्रेसला चाळीस जागाही मिळणार नाहीत, अशी टीकाही मंत्री आठवले यांनी केली. सातारा लोकसभेसाठी कोणाला उमेदवारी मिळेल, या प्रश्नावर मंत्री आठवले म्हणाले, ‘‘खासदार उदयनराजे भोसले हे येथील खासदार आहेत. त्यांना भाजपकडून तिकीट मिळावे, अशी अपेक्षा आहे; पण महायुतीत ज्यांना कोणाला तिकीट मिळेल त्यांचे काम आम्ही करू.’’

पालकमंत्र्यांनी रिपाइंला लक्षात ठेवावे

जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्यांच्या निवडीत रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळालेली नाही. त्यांची नावे यादीत नव्हती. याबाबत मंत्री आठवले यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व लक्षात ठेवावे. नियोजन समितीवर पदाधिकाऱ्यांना संधी द्यावी. आमच्या पक्षाकडून जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांचे नाव यादीत यावे, अशी सूचना त्यांनी केली.

राहुल गांधींनी पक्ष जोडावा

सध्या काँग्रेस पक्षातून अनेक दिग्गज मंडळी बाहेर पडत आहेत. नुकताच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आसाममधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी देश जोडण्याऐवजी स्वत:चा पक्ष जोडण्याचे काम करावे. देशभर फिरून त्यांना काहीही फायदा होणार नाही. सध्या एनडीएला चांगला प्रतिसाद मिळत असून, देश गतीने पुढे जात आहे. काँग्रेसच्या काळात देशाचा गतीने विकास झाला नाही, अशी टीकाही मंत्री आठवले यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT