insurance system
सातारा

काेराेनाने मृत्यू झाला असल्यास मिळते दाेन लाखांची रक्कम

2020-21 या आर्थिक वर्षात आपल्या प्रिय व्यक्तीने हे धोरण विकत घेतल्यास, नामनिर्देशित / वारस हक्कासाठी अर्ज करु शकतात.

सिद्धार्थ लाटकर

सातारा : काेराेनाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेने देशभरात माेठे संकट निर्माण केले आहे. दरराेज कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. अनेकांचा काेराेनामुळे मृत्यू (death) हाेत आहे आहे. या परिस्थितीत मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांच्या बाबतीत आयुर्विमा (insurance) महत्त्वाचा ठरतो. जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा कोविड-१९ (covid19) मृत्यू झाल्यास केंद्र सरकारची एक विमा योजना तुम्हाला दाेन लाख रुपयांचे विमा रक्कम मिळवून देऊ शकते. प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेअंतर्गत (PMJJBY) अशा या याेजनेचे नाव आहे. या याेजनेतून नागरिकांना दाेन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. (lost dear one to covid check out eligibility for rs 2 lakh govt insurance claim pradhan mantri jyoti bima yojana)

प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (पीएमजेजेबीआय) (PMJJBY) नऊ मे २०१५ ला सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत दाेन लाख रुपयांचे विमा संरक्षण बॅंकेत खाते असलेल्या १८ ते ५० वर्षे वयोगटातील नागरिकांना मिळते. तुमच्या बॅंकेच्या खात्यातून या योजनेचा प्रिमियम कापला जातो. जर एखाद्या व्यक्तीने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ही पॉलिसी घेतली असल्यास आणि दुर्दैवाने संंबंधिताचा मृत्यू झाल्यास त्याचे नाेंदणीकृत वारसदारास हे विमा रकमेसाठी दावा करू शकतात.

ही पॉलिसी एक वर्षासाठीची टर्म इन्श्युरन्स पॉलिसी आहे. यामध्ये एक जून ते ३१ मे पर्यतच्या एक वर्षाच्या कालावधीसाठी विमा संरक्षण मिळते. दरवर्षी ही पॉलिसी रिन्यू करावी लागते. कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास या विमा पॉलिसीअंतर्गत विमा संरक्षण दिले जाते. यामुळे कोविड-१९ मुळे झालेला मृत्यूचा देखील यात समावेश आहे. याशिवाय खून किंवा आत्महत्येमुळे झालेले मृत्यूदेखील या समाविष्ट आहेत.

पॉलिसीचा प्रिमियम

प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचा प्रिमियम दरवर्षासाठी ३३० रुपये इतका आहे. यामध्ये दाेन लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. पॉलिसीधारकाने इतर दुसरी कोणतीही पॉलिसी घेतलेली असल्यास या योजनेचे विमा संरक्षण हे अतिरिक्त विमा संरक्षण असते.

याचा अर्थ इतर पॉलिसीबरोबरच या पॉलिसीच्या दाव्याची रक्कम मिळते. ही पॉलिसी बॅंक खात्याद्वारेच घेता येते. त्यामुळे या पॉलिसीसाठीचा दावा त्याच बॅंकेत केला पाहिजे. एनरोलमेंट झाल्यानंतर ४५ दिवसांनी क्लेम लागू होतील. अर्थात अपघाताने मृत्यू झाल्यास ही अट लागू होत नाही.

या पॉलिसीअंतर्गत दावा हे ३० दिवसांच्या आतच करण्यात आले पाहिजेत अशा स्वरुपाची माहिती सध्या पसरवली जात आहे. याबाबात सर्वसामान्यांनी घाबरून जाऊ नये. प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेअंतर्गत दावा करताना मृत्यूचा दाखला, मृत्यूचे कारण, कॅन्सल्ड चेक आदी कागदपत्रे सादर केली पाहिजेत. दाव्याची रक्कम मिळण्यासाठी काही आठवडे किंवा क्वचित काही महिन्यांचाही कालावधी लागू शकतो. त्यामुळे नॉमिनीने घाबरून न जाता संबंधित बॅंकेच्या संपर्कात आपल्या दाव्यासाठी राहावे.

ही पॉलिसी कधीही विकत घेता येऊ शकते. ही पॉलिसी एका वर्षासाठीच असल्याने तुम्ही कोणत्या महिन्यात पॉलिसी घेता त्यानुसार प्रिमियम ठरतो. जास्तीत जास्त ३३० रुपयांचा प्रिमियम भरावा लागतो. मात्र जून ते ऑगस्टमध्ये ३३० रुपये, सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये पॉलिसी घेतल्यास २५८ रुपये, डिसेंबर ते फेब्रुवारी मध्ये १७२ रुपये, मार्च ते मे मध्ये ८६ रुपयांचा प्रिमियम भरावा लागतो.

31 मार्च 2021 पर्यंत पीएमजेजेबीवायमध्ये सुमारे 10.27 कोटी लोक नोंदले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, आथिर्क वर्षात 2,50,351 दावे प्राप्त झाले होते, त्यापैकी 2,34,905 दावे वितरित करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT