Tarali Dam esakal
सातारा

काळजी नको! तारळी धरणात मुबलक पाणी; पावसाळ्यापूर्वीच अर्धे भरले धरण

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (सातारा) : तारळे खोऱ्यासह दुष्काळी पट्ट्यातील माण-खटाव (Maan-Khatav) तालुक्‍यांसाठी महत्त्वपूर्ण तारळी धरणात सध्या मुबलक पाणीसाठा झाला आहे. पावसाळ्याचा पाऊस (Heavy Rain) सुरू होण्याअगोदरच धरण निम्मे भरले आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन न केल्यास जुलैमध्येच पूरस्थिती येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. (Lots Of Water Storage In Tarali Dam Satara Marathi News)

तारळी नदीवर मुरुड येथे सहा टीएमसी साठवण क्षमतेचे धरण बांधण्यात आले आहे.

तारळी नदीवर मुरुड येथे सहा टीएमसी साठवण क्षमतेचे धरण बांधण्यात आले आहे. धरणाच्या पाण्यावर तारळे खोऱ्यासह माण-खटाव तालुक्‍यांतील शेतीचे सिंचन होणार आहे. तारळे खोऱ्यातील सुमारे पाच हजार हेक्‍टर, तर माण व खटाव तालुक्‍यांतील सुमारे नऊ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येईल. तारळे खोऱ्यातील 50 मीटर हेडच्या योजना अंतिम टप्प्यात आहेत, तर माण- खटावला जाणाऱ्या पाण्याच्या बंदिस्त पाइपचे काम रखडले आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा उपलब्ध असतो.

यंदा उन्हाळी पाऊस झाल्याने तारळी नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या 11 बंधाऱ्यांत पाणी साचले आहे. त्यामुळे धरणातून नदीपात्रात फारसा विसर्ग झालेले नाही. पाणलोट क्षेत्रात दरवर्षी सरासरी दोन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. आगामी मॉन्सून पाहता पाण्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास जुलै मध्येच पुराचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे.

Lots Of Water Storage In Tarali Dam Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT