Muslims Banwadi
Muslims Banwadi esakal
सातारा

Karad : मुस्लिमांच्या राष्ट्रीय सणालाच वाजणार दर्ग्यातील भोंगा; 'या' ग्रामसभेत मोठा ठराव

सकाळ डिजिटल टीम

ही ग्रामसभा (Banwadi Village) शांततेत पार पडली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रदीप पाटील होते.

कोपर्डे हवेली : बनवडी (ता. कऱ्हाड) येथील मुस्लिम बांधवांच्या (Muslim) दर्ग्यातील भोंगा (Mosque Loudspeaker) मुस्लिम बांधवांच्या राष्ट्रीय सणादिवशीच सुरू ठेवण्यात येणार असल्याचा एक मोठा निर्णय मुस्लिम बांधवांच्या संमतीनं बुधवारी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला.

यास सर्वांनी एकमतानं मंजुरी देत निर्णयाचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. ही ग्रामसभा (Banwadi Village) शांततेत पार पडली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रदीप पाटील होते. यावेळी उपसरपंच मोहन जानराव, सदस्य विकास करांडे, शंकरराव खापे, पांडुरंग कोठावळे, अख्तर हुसेन आतार, अलका पाटील, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुगले, पोलिस पाटील रोहित पाटील उपस्थित होते.

यावेळी हजरत खैरत पीर देवस्थानला लागून असलेली दफनभूमी आजपासून बंद करून हजरत पीर दर्गा परिसरातील देवस्थान इमारतीच्या क्षेत्रातील भाग सोडून वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जागेमध्ये फक्त हजरत पीर दर्गा ट्रस्टच्या कुटुंबीयांचंच दफन करण्‍यात यावं. ही दोन गुंठे जागा दफनभूमीसाठी हजरत पीर ट्रस्ट व ग्रामपंचायत कार्यकारिणी यांच्‍या संमतीने घेऊन त्याला ट्रस्टकडून कंपाउंड करण्‍याचा ऐतिहासिक निर्णय ट्रस्टींच्या उपस्थितीत सर्वानुमते घेण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT