सातारा

सावधान! गाईवर लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय, मग अशी घ्या काळजी

Balkrishna Madhale

सातारा : लम्पी रोगाच्या आजारामुळे पशुपालकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी, तसेच या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पशुपालकांना या रोगाबद्दल व करायच्या उपाय योजनाबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी लम्पी स्कीन या आजाराबद्दल माहिती व रोग प्रादुर्भाव होऊ नये, यासाठीच्या उपाययोजना सातारा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी सांगितल्या आहेत.  

लम्पी स्कीन हा विषाणूजन्य रोग असून हा प्रामुख्याने गोवंशिय जनावरांना अर्थात गाई, बैल, वासरे यांना होणारा साथीचा आजार आहे. कॅप्रीपॉक्स या प्रवर्गातील विषाणूमुळे हा रोग होतो. सर्व साधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरीत जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. या रोगाचा प्रसार डास, माश्या, गोचीड इत्यादी मार्फत होतो. बाधित जनावरांपासून गोचीड व गो-माश्याद्वारे सदृढ जनावरास रोगाचा प्रसार होत असतो. या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष्य स्पर्शाने होतो. उष्ण व आद्र हवामानात या रोगाचा जास्त प्रसार होतो. या रोगाची बाधा गायवर्ग व म्हैसवर्गातील सर्व वयोगटातील जनावरांना होत असतो. लहान वासरांमध्ये देखील रोगाची तीव्रता अधिक दिसून येते. या रोगाचा प्रसार साधारण दहा ते वीस टक्के  जनावरांमध्ये होतो. यातील मुरतुकीचे प्रमाण एक ते पाच टक्के इतके आहे.

आजारामुळे मरतुकीचे प्रमाण कमी असले, तरी रोगी जनावरे अशक्त होत जातात. त्यांचे दुग्धत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते, तसेच काही वेळा गर्भपात होऊन प्रजनन क्षमता घटते. या रोगात त्वचा खराब झाल्याने जनावर खूप विकृत दिसते. लम्पी स्कीन आजारामध्ये जनावरांना ताप येणे, डोळ्यातून, नाकातून स्राव होणे, भूक मंदावणे इत्यादी सुरुवातीचे लक्षणे दिसतात. नंतर डोके, मान, मायांग, कास इत्यादी ठिकाणी दोन ते पाच सेंटीमीटर (१०-५० मिमी) व्यासाच्या गाठी येतात. त्यातून पु येऊ शकतो. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो. जनावरांचे दुध उत्पादन कमी होते. हा विषाणूजन्य आजार असल्याने त्यावर उपचार नाही, परंतु जखमामध्ये जीवाणूंचा संसर्ग होऊन दुय्यम आजार होऊ नये, म्हणून प्रतीजैविके पाच ते सात दिवस द्यावी लागतात. 

सात दिवसांच्या नियमित योग्य उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होतो. लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रथम आजारी जनावरांना वेगळे करावे, आजारी जनावरांचे खाद्य चारा, पाणी व्यवस्था वेगळी करावी, या आजाराचा किटकांपासून प्रसार होत असल्याने आपल्या गोठ्यातील किटकांचा, डास चावणाऱ्या माश्या, गोचीड यांचा बंदोबस्त करावा, तसेच गोठ्या शेजारी पाणी, शेण, मलमूत्र जमा होऊन चिखल होणार नाही याची काळजी घ्यावी. सोलापूरमध्ये काही ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला असल्याने सातारा जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्या पशुधनाची व्यवस्थित काळजी घ्यावी, जेणेकरून या रोगाचा प्रादुर्भाव टाळता येईल, तसेच जनावरांमध्ये वरील प्रमाणे रोगाची लक्षणे आढळून आल्यावर त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.

गाईंना लम्पी या संसर्गजन्य व विषाणूजन्य त्वचेचा आजार सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत झाला. तेथून तो देशात आसाममध्ये आला. सहा महिन्यांपूर्वी या आजाराचा शिरकाव राज्यात झाला. सर्वप्रथम परळी (जि. बीड) येथे लम्पी आजाराने ग्रासलेली गाय आढळून आली. त्यानंतर परभणी, नांदेड, जालना आदी जिल्ह्यात गाईंना हा आजार आढळला. या आजाराचा संपूर्ण राज्यात शिरकाव झाला आहे. जनावरांना होणारा लम्पी हा आजार संसर्गजन्य व विषाणूजन्य आहे. गाईंमध्ये हा रोग प्रामुख्याने आढळतो. तरुण जनावरे या आजारास अतिसंवेदनशील असतात. लम्पी हा त्वचेचा रोग असून कॅपीपॉक्स या विषाणूमुळे त्याचा संसर्ग होतो. त्वचेच्या खाली या आजारात गाठी येतात. त्या पिकून त्यातून पू वाहू लागतो. त्वचेवरील वाळलेल्या खपल्यांमध्ये तो ३० ते ३५ दिवस जिवंत राहतो. दरम्यान, या लम्पी रोगाबाबत काही अडचणी आल्यास अधिक माहितीसाठी ०२१६२ व २२१९०७ यावरती संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभाग, सातारा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT