Madhavi Chikhale Sakal
सातारा

Florence Nightingale Award : माधवी चिखले यांचा राष्ट्रपतींकडून गौरव

आरोग्य क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पातळीवरील यंदाचा ‘फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार’ माधवी चिखले यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

नागठाणे - आरोग्य क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पातळीवरील यंदाचा ‘फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार’ माधवी चिखले यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

माधवी चिखले या मूळच्या सातारा तालुक्यातील निगडी वंदन येथील रहिवासी आहेत. त्या सध्या पंजाबमधील मोहाली येथील फोर्टीस इस्पितळात मुख्य नर्सिंग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. देशभरातील ३४ लाख परिचारिकांच्या प्रस्तावांतून त्यांची २०२३ मधील ‘फ्लोरेन्स नाईटिंगेल’ पुरस्कारासाठी निवड झाली. राष्ट्रपती भवनातील सोहळ्यात राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुरुवातीच्या काळात त्यांनी महाराष्ट्रात सेवा बजाविली.

महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृतीत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. परिचारिका असलेल्या त्यांच्या आई स्मिता राणे, सासूबाई कांचन चिखले यांची प्रेरणा मोलाची ठरल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. पती अमोल, चिरंजीव चैतन्य, कन्या तपस्या यांच्यासह चिखले कुटुंबाचे पाठबळही महत्त्वपूर्ण ठरले. निगडी ग्रामस्थांसह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

मॅरेथॉनचा छंद...

आरोग्यसेवेत कार्यरत असताना माधवी चिखले यांनी धावण्याचा छंद जोपासला आहे. मुंबई ते पुणे ही १६० किलोमीटर अंतराची अल्ट्रा सिटी रन त्यांनी पूर्ण केली आहे. सातारा हिल मॅरेथॉनमध्येही सहभागी झाल्याची आठवण त्यांनी या निमित्ताने नमूद केली. इंडो- अमेरिकन सोसायटीची फेलोशिपही त्यांना प्राप्त झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

SCROLL FOR NEXT