सातारा

आमदार मकरंद पाटलांच्या चर्चेनंतर महाबळेश्वर पालिकेत रंगले राजकारण

अभिजीत खूरासणे

महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेच्या विविध विषय समितींच्या निवडीसाठी नगरसेवकांमधून एकही नामनिर्देशन पत्र आले नाही. त्यामुळे  विशेष सभाच रद्द करण्यात आली आहे. सलग तिसऱ्यांदा ही निवड प्रक्रिया  रद्द करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे.   

पालिकेच्या गेली दोन वर्षे रखडलेल्या विविध विषय समितीच्या सभापती निवडीसाठी पालिकेने ऑनलाईन विशेष सभा साेमवारी आयोजित केली होती. या निवडीसाठी नगरसेवकांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी वेळ  देण्यात आली होती. पालिकेतील सत्ताधारी आघाडीने या निवडींसाठी आपल्या सदस्यांना व्हीप बजावल्याने ही निवड चुरशीची होईल असा अंदाज व्यक्त केला जात हाेता. परंतु प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेत एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. त्यामुळे निवडीसाठी आयोजित करण्यात आलेली विशेष सभा रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. 

रानगव्यांचा कासला पुन्हा गव गवा

पालिकेत तीन आघाड्या असून यापैकी दोन आघाड्या सत्तेत आहेत. या तीनही आघाड्यांमधील काही सदस्यांनी आघाडीचा त्याग करून विरोधी आघाड्यांशी हातमिळवणी केल्याने पालिकेत मोठी राजकीय उलथापालथं झाली. त्यामुळे पालिकेतील विविध विषय समित्यांच्या या निवडींकडे शहराचे लक्ष लावून होते. प्रत्यक्ष सभेकडे पालिकेतील विद्यमान सदस्यांनी पाठ फिरवल्याने विविध विषय समितीच्या जागा रिक्तच राहिल्या.

शाकाहारी व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका फारच कमी असतो, असे एका ताज्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.  

पालिकेतील विविध विषय समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार मकरंद पाटील यांनी महाबळेश्वर येथे भेट देऊन पालिकेतील सदस्यांसोबत चर्चा करून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी व शिवसेना सदस्यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. सत्ताधारी भाजप सदस्यांमध्ये देखील या निवडणुकीमध्ये रस नसल्याचे दिसून आल्याने त्यांनीही सभेकडे पाठ फिरवली अशी चर्चा हाेती.

पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात युवती ठार; मुंढेत शाेककळा

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bachchu Kadu: ''बच्चू कडू मॅनेज?'' आरोप करणाऱ्यांवर कडूंचा संताप; म्हणाले, फायदाच झाला...

एका महिन्याला किती कमावतात माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने? आकडा ऐकून भुवया उंचावतील

IND A vs SA A 1st Test: रिषभ पंतला अपयश; आयुष म्हात्रेच्या फिफ्टीने वाचवली टीम इंडियाची लाज, दक्षिण आफ्रिकेकडे मजबूत आघाडी

IND vs AUS 2nd T20I Live: अभिषेक शर्मा एकटा भिडला! सूर्या, गिल, संजू फेल झाले असताना हर्षित राणा फलंदाजीत चमकला

Smart Anganwadi Kit: डिजिटल चालना; १६१ अंगणवाड्यांना स्मार्ट कि, प्रत्येकी १ लाख ६४ हजार ५६० रुपयांचा निधी, सुधारणेतील मोठा टप्पा

SCROLL FOR NEXT