सातारा

महाबळेश्‍वरच्या पंचायत समितीच्या सभापतिपदी राजपुरेंना संधी?

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती अंजनाताई सुभाष कदम यांनी आपला सभापतिपदाचा राजीनामा दिला आहे. कदम यांनी राजीनाम्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून, या जागेवर आता पुन्हा रूपालीताई राजपुरे यांची वर्णी लागणार का? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. रिक्त जागेवर सध्या उपसभापती संजय गायकवाड यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार गौडा यांनी कार्यभार दिला आहे.
 
सभापती अंजनाताई कदम यांनी अचानक राजीनामा दिल्याने हा राजीनामा देण्याचे कारण स्पष्ट नाही. सध्या महाबळेश्वर पंचायत समिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असून, रूपालीताई राजपुरे, संजूबाबा गायकवाड, अंजनाताई कदम हे राष्ट्रवादीचे असून, एकमेव आनंद उत्तेकर हे शिवसेनेचे सदस्य आहेत. त्यामुळे उर्वरित कालावधीसाठी या पदावर कुणाची वर्णी लागणार हे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे हे काय निर्णय घेणार यावर अवलंबून आहे; परंतु सध्या तरी रिक्त झालेल्या जागेवर नूतन सभापतीची निवड होईपर्यंत पदाचा कार्यभार उपसभापती संजय गायकवाड यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिला आहे.
 
सभापती कदम यांनी सहा एप्रिल रोजी सभापतिपदाचा राजीनामा दिला असल्याने पंचायत समितीचे सभापतिपद रिक्त झाले होते. सभापती निवडीपर्यंत सभापतिपदाचा कार्यभार सांभाळू शकतात. त्यामुळे गायकवाड हे सभापतिपदाचा कार्यभार चालवतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT