Maharashtra kesari Competition any Phad but Halgi is only mine Raju Awale satara sakal
सातारा

फड कुठला बी असू दे... हलगी फक्‍त माझीच

राजू आवळेंचे हलगीवादन वाढवतेय रंगत; घुमक, कैताळ देतोय दणका

सकाळ वृत्तसेवा

सातारा : आखाड्यातील मल्‍ल, त्‍यांनी ठोकलेले शड्डू आणि मैदानात होणारा हलगी, घुमक, कैताळ आणि तुतारीच्‍या निनादामुळे महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेत रंगत वाढीस लागली आहे. सहा जणांच्‍या मदतीने हलगीवादन करत मैदान आणि त्‍याठिकाणचे वातावरण तापवणारा हलगीसम्राट राजू आवळे हा कुरुंदवाड (कोल्‍हापूर) येथील असून, त्‍याबाबत आवळे फड कुठला बी, कुणाचा बी असू दे, हलगी फक्‍त माझीच कडाडते, असे सांगतात. लाल माती, आखाडा, फड आणि हलगीवादन हे राज्‍यातील कुस्‍तीक्षेत्राचे समीकरण आहे. या समीकरणाच्‍या मध्‍यभागी असतात, ते कुरुंदवाडचे राजू आवळे.

कलेबाबत सांगताना श्री. आवळे म्‍हणाले,‘‘ पिढ्यान्‌ पिढ्यांची कला आज आमच्‍या जगण्‍याचे, नावलौकिकाचे साधन बनले आहे. घरातली वडीधारी हलगी, घुमक, कैताळ वाजवायची, त्‍यांचे बघूनच ही कला मला अवगत झाली. वयाच्‍या सातव्‍या वर्षी पहिल्‍यांदा हलगी हातात घेतली, ती अजून कायम आहे. आज चाळीस वर्षे झाली ती सोबतच आहे. हलगी आणि फडाच्‍या नादापायी पाचवीतून शाळेला रामराम ठोकला आणि फडात हलगीसोबत घुमाय लागलो. कुठ बी फड असू दे, पोचायचेच, हा माझा शिरस्‍ता आहे. माझ्‍यासोबत सहा माणसे कायम असतात. त्‍यात घुमक, कैताळ, हलगी, तुतारी फुंकायला आणि हलगी तापवायला एक असतो. हलगीला चामडे रेड्याचे असते.

चामडे तापल्‍याशिवाय हलगी लागत नाही. त्‍यामुळे ते कायम तापवायला लागते व त्‍याची जबाबदारी कायम एकाकडे असते. अलीकडे फायबरची पानं मिळत्‍यात; पण त्‍यात ताल नसतो, असेही आवळे सांगतात.

आजपर्यंत राज्‍यासह देशाच्‍या कानाकोपऱ्यात जावून हलगीवादन करत कुस्‍त्‍यांच्‍या फडात रंगत आणली आहे. या हलगीवादनाची उत्तर प्रदेश, कर्नाटक सरकारने दखल घेत पुरस्‍काराने सन्मान केला आहे. आजपर्यंत मी आणि सहकाऱ्यांनी ११ कर्नाटक केसरी, १० महाराष्‍ट्र केसरी, ५ हिंद केसरी स्‍पर्धेत हलगीवादन केले आहे.

या मुख्‍य फडांबरोबरच गाव, तालुका, जिल्‍हा पातळीवरील सुमारे ४ हजारांहून अधिकचे फड आमच्‍या हलगीमुळे गाजले आहेत. कोरोनाचा कहर कमी झाल्‍याने आता मैदाने भरू लागलीत. त्‍यामुळे महिन्‍याला दहा ते बारा दिवसांचे काम होते. तीन महिन्ं‍यात सरासरी वर्षभराची बेगमी होईल, इतकी कमाई होते. हे काम कमी झाल्‍यानंतर हायच की आपली थोडी शेती, असेही श्री. आवळे सांगतात.

तालामुळे मैदान तापते

हलगीवादनाची काही शास्‍त्रे आहेत. ती अवगत असली की मैदानात केलेल्‍या हलगीचा कडका उपस्‍थितांना भावणारच. आम्‍ही मैदानात मर्दानी ताल, महाराष्‍ट्र केसरी ताल, डबल ठेका, सिंगल ठेका, करबल ताल, सनई-हलगी जुगलबंदी सादर करतो. यापैकी मर्दानी, महाराष्‍ट्र केसरी ताल सर्वाधिक कुस्‍ती शौकिनांच्‍या पसंतीस उतरत असल्‍याचे श्री. आवळे सांगतात.

- गिरीश चव्‍हाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT