Sharad Pawar  Sakal
सातारा

Jaykumar Gore : पवारांसोबत जाणाऱ्यांचा ओक्के कार्यक्रम; ठाकरेंनंतर भाजपकडून पवार 'लक्ष्य'

भाजपकडून सत्तेत आल्यानंतर प्रामुख्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात आले होते.

सकाळ डिजिटल टीम

BJP MLA Jaykumar Gore Attack On Sharad Pawar : बंडखोरीनंतर सत्तेत आलेल्या शिंदे गटावर आणि भाजपवर विरोधकांकडून विविध आरोप आणि टीका करण्यात आल्या. यामध्ये पन्नास खोके एकदम ओक्के ही टीका सर्वदूर पसरली. या टीकेला शिंदे गटाने आणि भाजपने वेळोवेळी प्रत्युत्तर दिले. भाजपकडून सत्तेत आल्यानंतर प्रामुख्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, आता भाजप नेत्यांनी त्यांचा मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवला असून, यामध्ये शरद पवारांना लक्ष्य करण्यात आले आहे. भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी ही टीका केली आहे. ते कराडमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

शरद पवारांवर टीका करताना गोरे म्हणाले की, पवारांसोबत जे गेले, त्यांचा ओक्के कार्यक्रम झाला, असा खोचक टोला लगावण्यात आला आहे. पवारांचा इतिहास सगळ्यांना माहिती असून, त्यांनी आजपर्यंत एकही गोष्ट विश्वासानं केलेली नसल्याचे गोरे म्हणाले. त्यांच्यासोबत जे कुणी गेले, त्यांचा ओक्के कार्यक्रम झाल्याचे सांगत काँग्रेस त्यांच्यासोबत गेली, काँग्रेसची काय अवस्था झाली हे आपण सर्वजण बघत आहात.

उद्धव ठाकरे गेले त्यांची काय अवस्था आहे हेदेखील सर्वांना परिचितत आहे. त्यामुळे पवारांसोबत जे कुणी गेले त्यांचा ओक्के कार्यक्रम झाला आहे. एवढेच काय, पवारांसोबत संजय राऊत नवाब मलिक आणि अनिल देशमुख गेले ते कुठे आहेत आज? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. जी व्यक्ती राज्याचं गृहमंत्री अख्ख पोलीस खातं चालवत होती, ती कधी तुरुंगात गेली त्यांनाही कळलं नाही, असा खोचक टोलादेखील गोरे यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : कोचिंग क्लास हा शिक्षणापेक्षा धंदा! कॉलेजची फी 20 हजार, क्लासची 1 लाख; राज ठाकरेंचा थेट सवाल

Success Story: जिद्दीला मेहनतीची जोड! अश्विनी मोरे यांची महानिर्मितीत अतिरिक्त कार्यकारी अधिकारीपदी निवड, प्रेरणादायी प्रवास

Abhijeet Dipke Claim : सीजेपीवर पाळत ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेतंय? अभिजीत दिपकेचा खळबळजनक दावा

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवडमधील तालेरा हॉस्पिटलमध्ये गॅस गळती,परिसरात भीतीचे वातावरण

Kolhapur Municipal Corporation Job : कोल्हापूर महापालिकेत मेगा भरती! 4,445 पदांच्या आकृतिबंधास मान्यता; उमेदवारांसाठी मोठी संधी, 700 पदे भरण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT