सातारा

सत्ताधा-यांनी 21 एकर 15 गुंठे क्षेत्रात टाकले आरक्षण; भाजप नेत्याच्या उपस्थित शेतक-यांनी साेडले उपाेषण

राजेंद्र ननावरे

मलकापूर (जि. सातारा) : येथील पालिकेने जाणून-बुजून आगाशिवनगर येथील 21 एकर 15 गुंठे क्षेत्रावर आरक्षण टाकले आहे, असा आरोप करत पवार कुटुंबीयांनी आरक्षणाविरोधात मुलाबाळांसहित नुकतेच  पालिकेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून पालिकेच्या सदोष आरक्षणाचा निषेध केला.
 
पवार कुटुंबीय म्हणाले, ""पालिकेने जाणून- बुजून आमच्या जमिनीवरच आरक्षण टाकले आहे. सत्ताधाऱ्यांनी आरक्षित जमिनीपैकी काही जमिनीची मागणी केली. विविध मार्गांचा अवलंब करून जमिनी काढून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आमची जमीन आमच्याकडून कधी काढून घेतली जाईल या चिंतेने आम्हा शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. सत्ताधारी व त्यांच्या हस्तकांच्या दहशतीखाली आम्ही राहतो. या बिकट परिस्थितीत आम्हाला गाव सोडून जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे.''
 
उपोषणकर्ते पवार कुटुंबाने मागणीचे पत्र पालिकेचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांना दिले. त्या वेळी मर्ढेकर यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. सर्व मागण्यांचा योग्य विचार केला आहे. तुम्ही सहा जणांच्या शेतीसह आरक्षणाबाबत सविस्तर माहिती द्या. ती पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेऊन जो निर्णय होईल तो नगरविकास विभागाकडे पाठवतो, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
 
उपोषणास भाजपचे प्रदेश सदस्य अतुल भोसले, शेतीमित्र अशोकराव थोरात, पालिकेचे विरोधी पक्षनेते अजित थोरात, भारत जंत्रे, नितीन काशीद, तानाजी काशीद, अण्णासाहेब काशीद, अजित देसाई, दत्तात्रय शिंगण, अरुण पवार, अरुणादेवी पाटील, डॉ. सारिका गावडे, संजय पवार, विद्यादेवी शिंदे, ऍड. दीपक थोरात, सूरज शेवाळे यांनी उपोषणस्थळी पवार कुटुंबीयांची भेट घेऊन पाठिंबा दिला. अतुल भोसले व अशोकराव थोरात यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडले. 

सरपंचपद स्वीकारल्यानंतर मृत्यू हाेताे! अशा गावाची जबाबदारी घेतली शीतल राजपुरे

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेकडून दिवाळीचा धमाका! उत्सवकाळात सोडणार तब्बल १,१२६ विशेष गाड्या, पाहा वेळापत्रक

iPhone 17 Order : आयफोन घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरबसल्या 10 मिनिटात मिळवा iPhone 17, 'ही' आहे सोपी ट्रिक

Dhananjay Munde: ''ओबीसींचा कट-ऑफ बघा अन् EWSचा बघा...'', धनंजय मुंडे मराठा आरक्षणावर बोलले

Viral Video : सचिन तेंडुलकरचं विमान वादळात अडकलं, हिंसक प्राणी असलेल्या जंगलात करावी लागली एमर्जन्सी लँडिंग

Income Tax Notice: खबरदार! मित्रांचं बिल भरण्यासाठी तुमचं क्रेडिट कार्ड वापरताय? तर आयकर विभाग कारवाई करणार

SCROLL FOR NEXT