Chain Hunger Strike Maratha Community Karad esakal
सातारा

Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; जरांगे-पाटलांच्या आदेशाचं पालन करत गावा-गावांत साखळी उपोषण सुरु

मराठा आरक्षणाचे लोण महाराष्ट्रात पसरले आहे.

हेमंत पवार

जरांगे-पाटील यांच्या कऱ्हाड (जि. सातारा) येथील जाहीर सभेत त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरला अल्टिमेटम देण्यात आला आहे.

कऱ्हाड : मराठा आरक्षणाचे लोण महाराष्ट्रात पसरले आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला जाग आणण्यासाठी आजपासून महाराष्ट्रात साखळी उपोषण सुरु करण्याचे आवाहन मराठा समाजाला केले होते. त्यानुसार आज कऱ्हाड (जि. सातारा) शहरासह तालुक्याती अनेक गावांत साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी महाराष्ट्रभर दौरे करुन जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. राज्यातील सर्वांत मोठा बहुसंख्य समाज असूनसुद्धा या समाजातील असंख्य युवक रोजगारापासून वंचित राहिलेले आहेत. यामुळे मराठा समाज आर्थिकदृष्ट्या व शैक्षणिकदृष्ट्या खूपच मागास राहिलेला आहे.

जरांगे-पाटील यांच्या कऱ्हाड (जि. सातारा) येथील जाहीर सभेत त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरला अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्यानंतर काय करायचे हे आपण सर्वजण ठरवू. मात्र, सरकारला त्या तारखेची आठवण रहावी आणि आरक्षण देण्यासाठी वेगाने हालचाली कराव्या यासाठी एक डिसेंबरपासून गावोगावी साखळी उपोषण सुरु करा, असे आवाहन केले होते.

त्यानुसार आजपासून गावोगावी साखळी उपोषण सुरु करण्यात आली आहेत. त्याअंतर्गत आज कऱ्हाड शहरातील साखळी उपोषणाची सुरुवात दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्याचबरोबर तालुक्यातील सैदापूर, खोडशी, मलकापूर परिसरासह तालुक्यातील अनेक गावांत साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे चांगलीच वातावरण निर्मिती झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी, एस जयशंकर यांच्या फोन कॉलनंतर इराणचा मोठा निर्णय

Jasprit Bumrah: 'माझ्याकडून बुमराह स्लोअर बॉल्स शिकला...', पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा अजब दावा

Latest Marathi News Live Update : शनिवारवाड्याच्या बाजूच्या गेटजवळ कचऱ्याला आग

Cosmetic Treatment Safety: लेसर, बोटॉक्स, हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी सावधान! तज्ज्ञांकडूनच उपचार घेण्याचा इशारा

Kolhapur Bangalore airport connectivity : देशातील सर्वात मोठा आयटी पार्क असलेल्या शहरासोबत कोल्हापूर विमानसेवा होणार सुरू

SCROLL FOR NEXT