Maratha Reservation esakal
सातारा

'कोरोनाचे संकट-संचारबंदी संपल्यावर मराठा समाजाची भूमिका वेगळी असेल'

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राज्य शासन बाजू मांडण्यास कमी पडल्याने या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.

विकास जाधव

काशीळ : मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर (Supreme Court Judgement) देशमुखनगर (ता. सातारा) येथे या परिसरातील काही युवक कार्यकर्त्यांनी मुंडण करून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) दिलेल्या निर्णयावर राज्य शासन बाजू मांडण्यास कमी पडल्याने या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. या वेळी कार्यकर्त्यांनी 'एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमचे हक्काचे' अशा घोषणा दिल्या. (Maratha Reservation Issue Agitation At Deshmukhnagar Kashil Satara News)

कामेरीचे सरपंच सुंदर घाडगे, महेश घाडगे म्हणाले, "मराठा आरक्षणाबाबत राज्य शासन बाजू मांडण्यास कमी पडले असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व जमावबंदीचा आदेश असल्याने सर्व नियम व अटींच्या अधीन राहून घरातच मुंडण करून या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी केलेला आर्थिक आरक्षणाचा मुद्दा योग्य असून, कोरोनाचे संकट व संचारबंदी संपल्यावर मराठा समाजाची भूमिका वेगळी असेल.'' या वेळी सरपंच सुंदर घाडगे, आर. डी. घाडगे, महेश घाडगे, सुनील देशमुख, समाधान घाडगे, संदीप सूर्यवंशी, दीपक घाडगे यांनी मुंडण करून निषेध व्यक्त केला.

Reservation : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरंच 10 वर्षांसाठी आरक्षण हवे होते? जाणून घ्या 'सत्य'

Maratha Reservation Issue Agitation At Deshmukhnagar Kashil Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal’s Gen-Z Protest: नेपाळ मधील राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?

Satej Patil : गोकुळ दूध संघातील उत्तरे समजण्यासाठी परिपक्वता लागते, सतेज पाटलांचे, शौमिका महाडिकांवर टीकास्त्र

Womens Hockey: भारताचा गत उपविजेत्या द. कोरियावर विजय; आशियाई महिला हॉकी करंडक : ४-२ने विजय, आता चीनशी लढत

Pandharpur To Pune Shivai Bus: 'पंढरपूर ते पुणे शिवाई बसच्या दरराेज २२ फेऱ्या'; प्रवाशांच्या मागणीनुसार वातानुकूलित आरामदायी प्रवास

Nepal Reality Explained: नेपाळ सरकारचं खरंच चुकलं की Gen Z चा अभ्यास कमी पडला? खरं वास्तव काय?

SCROLL FOR NEXT